Halloween party ideas 2015


नाव बदलवणारे क्रिकेटपटू
कोणताही मनुष्य जन्माला आला की त्याला ओळखण्यासाठी एक नाव देण्याची प्रथा या जगात आहे. मग ते नाव वापरून तो आपल्या कर्तृत्वाने स्वतःची वेगळी ओळख बनवितो. मग ते कमवलेले नावच त्याची आयडेंटीटी होऊन जाते. मग क्रिकेटपटूही याला अपवाद कसे ठरू शकतील ? क्रिकेटच्या मैदानावर आपल्या नेत्रदिपक खेळाच्या जोरावर आपला वेगळा चाहता वर्गही हे क्रिकेटपटू तयार करतात. मग त्यांच्या नावाला एक वेगळे वलय तयार होते.
परंतु जागतिक क्रिकेटच्या इतिहासात सहा असे खेळाडू होऊन गेले आहेत की ज्यांनी क्रिकेटमध्ये मध्ये अद्वितीय कामगिरीने नाव कमावलं खरं पण काही विशेष कारणास्तव ते नावच बदलून टाकून नवे नाव परिधान केले. या सहा जणात प्रत्येकी दोन भारतीय व श्रीलंकन तर प्रत्येकी एक खेळाडू पाकिस्तान व द. आफ्रिकेचा आहे.
एजी कृपाल सिंग हा भारतीय क्रिकेटपटू. याच्या नावे एक अफलातून पराक्रम आहे. कसोटी पदार्पणातच शतक करणारा हा भारतीय फलंदाज. त्याने सन १९५५ ते ६४ या कालखंडात भारताकडून १४ कसोटी खेळून २८.१३ च्या सरासरीने ४२२ धावा काढल्या. त्याचबरोबर गोलंदाजीत १० बळीही मिळविले. परंतु त्याची कारकिर्द जास्त लांबली नाही.
   एजी कृपाल सिंग हा जन्माने शिख धर्माचा होता, परंतु त्याने एका ख्रिश्चन मुलीशी लग्न केल्याने शिख धर्म सोडून ख्रिश्चन धर्माचा स्विकार केला. धर्मांतरानंतर आर्नोड जॉर्ज हे नवं नाव त्याने अंगिकारलं. त्याने धर्मांतर जरी केले असले तर त्यांचे दोन्ही धर्माशी आदराचे संबंध होते. धर्मातरांनंतर त्यांनी पगडी व दाढी काढून टाकली. सन १९८७ मध्ये त्याचे निधन झाले.
                    मन्सूर अली खान पतौडी हा भारताचा सर्वात कमी वयाचा कर्णधार. तो भारताकडून ४६ कसोटी खेळला त्यात ३४.९१ च्या सासरीने २७९३ धावा फटकविल्या त्यामध्ये ६ शतके व १६ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे तो एका डोळ्याने अधू होता.
                   सन १९७१ मध्ये भारत सरकारने सर्व संस्थाने, राजघराणे कायदयानुसार संपुष्टात आणले. मन्सूर अली हा हैद्राबादचा संस्थानिक होता. त्यामुळे त्याला पतौडी ही उपाधी दिली होती. परंतु संस्थानच खालसा झाल्याने त्याची पतौडी उपाधीही गेली.
                  त्यानंतर त्याचे कर्णधारपदही गेले. त्याला आपल्या निव्वळ नावातच नाही तर स्वाक्षरी मध्येही बदल करावा लागला. कारण सहीमध्ये पतौडी असा उल्लेख होता. आयुष्यभर तो पतौडी नावानेच ओळखला जायचा. परंतु सरकारनेच ते पद रद्द केल्याने त्याने आपले नाव मन्सूर अली खान असे बदलले. या बदला नंतर तो ७ कसोटी सामने खेळला परंतु पूर्वीचा जोश मात्र त्यात दिसला नाही. 
                 पाकिस्तानच्या कायद्यानुसार तेथील कोणत्याही व्यक्तीला कोणतेही मानाचे पद हवे असेल तर तो मुस्लीम असणे गरजेचे असते, त्याशिवाय तेथील इतर धर्माचा कोणताही व्यक्ती कोणतेही महत्त्वाचे पद मिळवू शकत नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे त्यांचा सर्वात यशस्वी फलंदाज युसुफ योहाना हा स्वतः आहे. योहाना मुळचा ख्रिश्चन धर्मीय. परंतु त्यामुळेच त्याला सर्व प्रकारची गुणवत्ता असूनही पाकचे कर्णधारपद मिळत नव्हते. शेवटी पाकचा माजी कर्णधार व योहानाचा मित्र सईद अन्वरने त्याला धर्मांतरासाठी तयार केले व मुस्लीम धर्म स्विकारायला मदत केली.
                   धर्मातरानंतर युसूफ योहानाचा, मोहम्मद युसुफ बनला व पाकचा कर्णधारही झाला. युसुफ त्याच्या कारकिर्दीत ९० कसोटी खेळला. त्यात ५२.२९ च्या सरासरीने २४ शतके व ३३ अर्धशतकांसह  ७५३० धावा बनविल्या. तर २८८ वनडेत ४१.७१ च्या सरासरीने १५ शतके व ६४ अर्धशतकांसह ९७२० धावा फटकविल्या.एवढेच नाही तर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधीक १७८८ धावा करण्याचा जागतिक विक्रम आजही त्याच्या नावे आहे.
                 श्रीलंकेचा खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा दिलशान तिलकरत्ने फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षण या सर्वच क्षेत्रात परफेक्ट होता. कर्णधार म्हणूनही श्रीलंकन संघाची धुरा त्याने सांभाळली आहे. त्याने विकसीत व लोकप्रिय केलेला स्कुप शॉट आजही " दिलशान स्कुप " म्हणूनच ओळखला जातो.
                       दिलशान ८७ कसोटी खेळला. त्यात ४०.९८ च्या सरासरीने ५४९२ धावा फटकविल्या. त्यात १६ शतके व २३ अर्धशतके सामील आहेत. त्याचबरोबर ३३० वनडेत ३९.२७च्या सरासरीने १०२९० धावा ही जमविल्या आहेत. त्यात २२ शतके व ४७ अर्धशतके जमा आहेत. शिवाय १०६ बळीही त्याच्या नावे आहेत.
                   आपणास खरे आश्चर्य आता वाटेल. दिलशानचा जन्म एका मुस्लीम कुटुंबात झाला. परंतु त्याला भगवान गौतम बुध्दाने दिलेली शिकवण फार आवडली. त्यामुळे त्याने वयाच्या १६ व्या वर्षीच कोणाच्याही दबावाविना बौध्द धर्माचा स्विकार केला. धर्म बदलण्यापूर्वी त्याचे नाव मोहम्मद दिलशान होते. धर्मांतरानंतर त्याचे नाव दिलशान तिलकरत्ने झाले.
                    दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज वायने पारनेल हा मुळचा ख्रिश्चन धर्मीय. परंतु अचानक त्याला मुस्लीम धर्म का स्विकारावा लागला हे एक कोडेच आहे. सन २०११ मध्ये त्याने मुस्लिम धर्म स्विकारला. त्याच्या या धर्मांतरामागे त्याचेच संघ सहकारी इमरान ताहीर व हाशिम आमला असल्याच्या चर्चा होत्या. धर्मांतरानंतर त्याने त्याचे मुळ नाव काही बदलले नाही.
             श्रीलंकेचा ऑफ ब्रेक गोलंदाज सुरज रणदिव हा सुध्दा या गटात सामील असलेला खेळाडू आहे. श्रीलंकेसाठी तो १२ कसोटी व ३० वनडे खेळला. याच सुरजचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला. मात्र २०१० मध्ये त्याने बौद्ध धर्माचा स्विकार केला. सुरज रणदिव हे त्याचं धर्मांतरानंतरचं नाव आहे. त्यापूर्वी त्याचं नाव होतं मोहम्मद मरशूक मोहम्मद सूरज. 

लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.