अंबरनाथ (प्रतिनिधी) अंबरनाथमधील आनंदनगर एम आय डी सी मधील विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या गरजू कामगारांच्या १५० परिवाराला आज जीवनावश्यक वस्तूच्या पॉकेट चे वाटप करण्यात आले.
आरएसपी शिक्षक युनिटने एका एनजीओच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी साईलीला उत्सव मंडळाचे अध्यक्ष व कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण इंगळे, जे वाय फरसाण चे किशोर नारड, आरएसपी कल्याण डोंबिवली समादेशक मनीलाल शिंपी, आरएसपी शिक्षक अधिकारी अनिल बोरनारे, कैलास पाटील, जितेंद्र सोनवणे, दिलीप पावरा, योगेश अहिरे तसेच साईलीला उत्सव मंडळाचे हरीश भानुशाली, योगेश शेलार, शरद कटारिया, उमेश महाडिक आदींच्या हस्ते वस्तूंचे वाटप करण्यात आले.
अंबरनाथ मधील आनंदनगर एमआयडीसी मधील अनेक कारखान्यातील कामगारांना लॉकडाउन मुळे घरीच राहावे लागत आहे. त्यातच वेतन बंद असल्याने अनेक मजूर परिवारांची परवड सुरू होती. त्यामुळे त्यांच्यापर्यंत मदत पोहचविणे गरजेचे होते. त्यासाठी हा पुढाकार घेऊन जीवनावश्यक वस्तूचे पॉकेट बनविण्यात आले यामध्ये तेल, बटाटे, तांदूळ व इतर वस्तुंचा समावेश होता.
