Halloween party ideas 2015


लॉकडाऊनचा महिलांच्या दिनचर्येत कुठलाच फरक नाही
कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सगळीकडे लॉकडाऊन सुरू झाला. संपूर्ण जग शांत झाले. रेल्वे, आँफिसे, कारखाने, शाळा सगळेच बंद झाले. बाहेर जाण्याची परवानगी नसल्याने घरात बसलेल्या शिवाय पर्याय नाही. आज सगळेजण घरी बसून आपले छंद पूर्ण करत आहे. पण याला अपवाद महिला आहेत.
संपूर्ण जग थांबले पण महिला मात्र थांबल्या नाही. नोकरी करताना ती घर आणि ऑफिस दोन्ही कामे उत्तमरीत्या पार पाडत होती. लॉकडाऊन काळात कुंटुंबातील सदस्य सगळे घरी बसून आराम करत असताना महिला मात्र आराम करताना दिसत नाही. सतत घरातील कामे करणे, घरातील प्रत्येक माणसांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्याप्रमाणे वेगवेगळे पदार्थ खाऊ घालणे. हे काम महिला आधी सुद्धा करायच्या पण फक्त सुट्टीच्या दिवशी. पण आता हे रोजचे काम झाले आहे. तरी त्यांनी न कंटाळता आपले काम सुरू ठेवले आहे.
जग थांबले आता आपण ही थांबले पाहिजे असा विचार तिने कधीही केला नाही. आणि आपण फक्त आराम करावा अशी अपेक्षा पण तिने कधीच केली नाही. उलट रोज एक नवीन आव्हान स्वीकारुन ती आपल्या कर्तव्यात तत्पर आहे.
स्त्री ही एक अजब रसायन आहे. कितीही संकटे आली तरी ती न डगमगता धैर्याने तोंड देत आणि आपल्या कुंटुंबाला त्यातून बाहेर काढते. या काळात सुद्धा ती अतिशय शांत राहून आपले कर्तव्य पोलिस, नर्स, डॉकटर,शासकीय अधिकारी आणि गूहिणी या रूपात पार पाडत आहे. आणि अशा विचार वेळी त्याचे कुंटुंब त्याच्यामागे अगदी ठामपणे उभे आहेत.
लॉकडाऊन असो किंवा नसो पण महिला नेहमी आपली कर्तव्य आनंदाने पार पाडतात. जग थांबले आहे ,ते कधीही सुरू होईल याचा विचार न करता त्यांनी आपली कामे सुरू ठेवली आहे.
स्त्रिया ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील,शिक्षित असो की अशिक्षित पण आपल्या कुंटुंबाप्रती जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडतात. त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव पूर्णपणे आहे. ती त्यांनी कधीही टाळण्याचा प्रयत्न केला नाही, किंवा माघार घेतली नाही.
आज स्त्रिया स्वबळावर अनेक वरिष्ठ पदावर काम करतात पण त्याचबरोबर आपल्या कुंटुंबाला चांगल्या पद्धतीने सांभाळतात.आपल्या कुंटुंबाला प्राधान्य देतात.
आपल्या मुलांना चांगले संस्कार आणि शिक्षण देतात. आई,पत्नी, मुलगी, बहीण या भूमिका ती आजही उत्तम प्रकारे पार पाडते ते ही शेवटपर्यंत .
आणि एक वेळ जग थांबले तरी चालेल पण ती थांबता कामा नये.कारण ती थांबली तर संपूर्ण कुंटुंब थांबते.
अशा या स्त्री कर्तृत्वाला मानाचा मुजरा !

अमिता कदम
ठाणे, ( मुंबई )
9819395788.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.