Halloween party ideas 2015


टि २० आंतरराष्ट्रीय सामन्यात शुन्यावर बाद होण्याची हॅट्रीक करणारे फलंदाज
आयुष्यात प्रत्येक गोष्टीची सुरुवात शुन्यातूनच होत असते. पण शेवट शुन्यातच व्हावा असे कुणालाच वाटत नाही. मग हिच बाब क्रिकेटपटूंच्या बाबत बघितली तर त्याची कल्पनाच न केलेली बरी. शुन्यावर बाद होणे कोणत्याच खेळाडूला आवडणारं नसतं. परंतु सदर खेळाडूवर अशी काही परिस्थिती गुदरते की त्याला इच्छा नसतानाही शुन्यावर बाद होऊन गुमानपणे काखेत बॅट, हातात हेल्मेट, हताशपणे जमीनीकडे बघत पॅव्हेलियनकडे गलितगात्र पावलांने चालत जावे लागते. पण हिच वेळ त्याच फलंदाजावर सलग तीन सामन्यात ओढवली तर त्याच्यावर काय बितत असेल याची सल सगळ्यात जास्त तो खेळाडूच जाणत असेल.
प्रस्तुत लेखात आज मी, टि- २० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सलग ३ सामन्यात शुन्याचा धनी बनलेल्या चार दुर्देवी फलंदाजांविषयी सांगणार आहे.
मोहम्मद हाफिज हा पाकिस्तानचा माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू. पाकिस्तानसाठी हाफिज ५५ कसोटी सामने खेळला. त्यात ३७.६५च्या सरासरीने ३६५२ धावा काढल्या. तसेच २१८ वनडे सामन्यात ३२.९१ च्या सरासरीने ६६१४ धावा बनविल्या. तर कसोटीत ५३ तर वनडेत १३९ फलंदाजांना त्याने बादही करून पाकच्या अनेक विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.
टि - २० सामन्यांचं हाफिजचं रेकॉर्ड बघितलं तर ९१ सामन्यात १९९२ धावा त्याने फटकविल्या आहेत. परंतु सन २०१२ मध्ये त्याच्यावर एक दुर्देवी प्रसंग ओढवला. इंग्लंडविरूध्द सलग २ तर श्रीलंकेविरूध्द एक अशा एकूण तीन सलग सामन्यात तो शुन्यावर बाद झाला आहे.
मोईन अली हा इंग्लंडचा अतिशय गुणवान असा अष्टपैलू खेळाडू. बॅटींग, बॉलींग फिल्डींग च्या जोरावर तो सतत प्रकाश झोतात असतो. इंग्लंडसाठी तो ६० कसोटी, १०१ वनडे सामने खेळला. आयपीएलमध्ये आरसीबी कडून खेळताना १६ सामन्यात २९७ धावा व ९ बळीही त्याने घेतले आहेत.
इतकेच नाही तर इंग्लंडकडून २८ टि-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २८४ धावाही फटकविल्या आहेत. परंतु सन २०१५ च्या मोसमात पाकिस्तानविरूध्द सलग दोन व दक्षिण आफ्रिकेविरूध्द एक अश्या सलग तिन सामन्यात शुन्यावर बाद होऊन एक अपमानजन्य कारनामा त्याने केला.
ल्यूक राँची हा न्यूझिलंडचा यष्टीरक्षक फलंदाज. सन २००८ ते १८ या कालखंडात तो न्यूझिलंडकडून ३३ टि -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला. त्यामध्ये त्याने ३५९ धावा टोलविल्या. हाच राँची आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडूनही खेळला आहे. इतकेच नाही तर जगभरातील अनेक टि२० लिगमध्ये सलामीला खेळून त्याने अनेक मातब्बर गोलंदाजांना फोडून काढले आहे. यंदाच्या वर्षी पाकिस्तान सुपर लिगमध्ये इस्लामाबाद युनायटेड कडून शानदार फलंदाजीही केली आहे.
पण ल्युक राँचीच्या कारकिर्दीत एक वाईट प्रसंग घडला सन २०१८ मध्ये अनुक्रमे बांगलादेश, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांच्या विरूध्द त्याच्या शेवटच्या सलग तिन टि-२० सामन्यात शुन्यावर बाद झाला. त्यानंतर मात्र न्यूझिलंड संघात त्याला परत निवडले गेले नाही.
वॉशिंग्टन सुंदर हा भारताचा अष्टपैलू खेळाडू असला तरी तो फलंदाज म्हणून कमी तर गोलंदाज म्हणून जास्त ओळखला जातो. चांगल्या पैकी गोलंदाज असलेला सुंदर भारताकडून फक्त टि-२० मध्येच वापरला जातो. भारतासाठी तो २३ सामने खेळला. त्यामध्ये ६.९३ च्या इकॉनॉमी रेटने एकूण १९ बळी घेतले. शिवाय या २३ सामन्यात त्याला केवळ ७ वेळा फलंदाजीची संधी मिळाली. त्यातही दुर्देवाची बाब म्हणजे त्याच्या शेवटच्या तीन सामन्यात तो शुन्यावर बाद झाला.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.

Email: dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.