*पाडसे येथे गावठी दारू विकणाऱ्या महीलेवर मारवड पोलिसांची कारवाई*..
पाडसे येथील अवैध गावठी दारू विकणाऱ्या महिलेविरुद्ध गावातील तरुणांनी सरपंच व पोलीस पाटील यांच्याकडे तक्रार केली. सदर तक्रारी नुसार दारू विक्री करणाऱ्या जिजाबाई बुधा वडर हिला सरपंच,पोलीस पाटील व ग्रामस्थांनी वेळोवेळी समज दिली.परंतु लॉकडाऊन सुरू असतांना सदर महिलेने ग्रामस्थांना न जुमानता अवैध गावठी दारुची विक्री सुरू ठेवली.त्यामुळे आजुबाजूला असलेल्या गावातील व्यक्ती दारू पिऊन वारंवार भांडणे करून वातावरण दुषित करीत होते.म्हणून आज दि.१९ रोजी गावातील ग्रामस्थांनी सापळा रचून जिजाबाई वडर हिला दारू विकतांना रंगेहाथ पकडले आणि पोलिसांना पाचारण केले.या कामात प्रविण पाटील,राहूल दगडू पाटील,संदिप पाटील,अँड.किशोर पाटील,रामकृष्ण कोळी यांनी पुढाकार घेऊन अवैध दारुचा साठा व जिजाबाई वडर हिला ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.
