8 मार्च जागतिक महिला दिन निमित्त साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . प्रसंगी उगम फांऊंडेशन डोंबिवली यांचे तर्फे सॅनेटरी पॅड वेंडिंग मशीन शाळेला भेट देण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान अ . शि . प्र . मंडळाचे सचिव संदिप घोरपडे यांनी भूषविले . प्रमुख पाहुणे म्हणून उगम फोऊंडेशन चे सहखजीनदार मा . प्रशांत निकम उपस्थित होते . मा . मुख्यi. श्रीमती अनिता बोरसे . शिक्षक प्रतिनिधी श्री .विलास चौधरी ' मा . शुभम निकम इ . मान्यवर उपास्थित होते .
प्र संगी सॅनटरी वेंडिंग मशीन कसे हाताळावे यांचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक मुलींना देण्यात आले . प्रास्ताविक मा . अनिता बोरसे यांनी केले . सॅनेटरी पॅडचे महत्त्व व मासिक पाळीत घ्यावयाची काळजी याची माहिती दिली . अध्यक्ष मा . घोरपडे _ सरांनी देखिल याबाबत मार्गदर्शन केले . कार्यक्रमाला मोठया संखेने विद्यार्थीनी ची उपस्थिती होती . सूत्रसंचालन श्रीमती धनश्री वानखेडे यांनी केले . आभार श्रीमती विद्या पाटील यांनी मानले .