Halloween party ideas 2015



विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला पाचपावली देवीचा जिर्णोद्धार,

प.पू. प्रसाद महाराजांच्या हस्ते झाले ध्वजारोहण, असंख्य मान्यवरांची उपस्थिती

अमळनेर-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शहरातील पोलिस लाईनमधील जागृत अशा पाचपवली देवीच्या जिर्णोद्धाराच्या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप झाला. मंदिरात आता नवीन राजस्थान येथून आणलेल्या मुर्त्यांची स्थापना करण्यात आली असून 50 वर्षानंतर या मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे.
1970 मध्ये शहरातील प्रसिद्ध उद्योगपती व आर. के.पटेल ग्रुपचे मालक राजधर काळू पाटील यांनी मूर्त्या देऊन या मंदिरात त्या मूर्त्यांची स्थापना केली होती. आर. के. ग्रुपने पुन्हा एकदा पुढाकार घेत मंदिरात 50 वर्षानंतर खंडित झालेल्या मूर्त्या काढून त्या जागी जयपूर राजस्थान येथून आणलेल्या नविन मुर्त्यांची स्थापना केली. गेल्या 3 दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात सुरू होते. शुक्रवारी
झालेल्या जीर्णोद्धार पूजेत पोलिस
निरीक्षक अंबादास मोरे, मितेश पाटील, प्रसाद झारे, महेश कुलकर्णी यांचा सपत्नीक सहभाग होता. पूजेनंतर संत सखाराम महाराज संस्थांनचे गादीपती प्रसाद महाराजांच्या हस्ते पूजा व मंदिरावर
ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी
माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील, डी वाय एस पी राजेंद्र ससाणे,पो नि अंबादास मोरे माजी नगराध्यक्ष उद्योगपती विनोदभैय्या पाटील, उद्योगपती वसंत पाटील, उद्योगपती प्रवीण पाटील, प्रदीप अग्रवाल, योगेश मुंदडा, जितेंद्र जैन, पंकज मुंदडा, डिगंबर महाले, सुहास राणे, मुकुंद विसपुते, विवेक देशमुख, महेश कोठावदे, सुनिल चौधरी, भास्कर बोरसे, किरण पाटील, मनोज पाटील, डॉ विजय पवार, रमेश जीवनानी, प्रविण जैन, सौ ज्योती मोरे, सौ लिना पाटील, सौ मंगला पाटील, सौ राजश्री पाटील, सौ मोनाली पाटील, दिव्या जीवनानी यासह असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी महाआरती नंतर भक्तांना तिर्थप्रासाद वाटण्यात आला.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.