कासोदा (प्रतिनिधी )
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार अंतर्गत व ग्रामपंचायत कासोदा यांना मिळणाऱ्या 14 वित्त आयोगामार्फत यांच्या संयुक्त योजनेअंतर्गत येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा नं. २ शाळेला संरक्षण भिंत तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्या हस्ते आज दिनांक ७ मार्च २०२० शनिवार रोजी पार पडला तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एम पाटील यांच्यासह एरंडोल चे तहसीलदार अर्चना खेतमाळीस एरंडोल पंचायत समितीचे व्हिडिओ श्री खाडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उज्वला पाटील हिंगणगाव गटाची जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन पंचायत समितीचे उपसभापती अनिल महाजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष हिम्मतराव पाटील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा महानंद पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाच्या अगोदर जिल्हा परिषद उर्दु शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले यावेळी जिल्हा अधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी मनोगतात मनोगत व्यक्त करताना सांगितले की जिल्ह्यातील 200 शाळांना संरक्षण भिंत आहे तर सातशे ते साडे सातशे संरक्षण भिंत नसल्यानचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले जिल्ह्यातील शाळांचे संरक्षण भिंतीला साडेपाच कोटी एवढा निधी लागत आहे पुढे बोलताना त्यांनी सांगितले की ग्रामपंचायत असो की गावकरी शाळा त्यांनी आपले मानायला हवे त्यामुळे बरेचसे प्रश्न निर्माण झाले आहेत ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे की शिक्षण व आरोग्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने घेतली पाहिजे परंतु ग्रामपंचायत त्यांनी जेवढे लक्ष दिले पाहिजे तेवढे दिले जात नाही यासाठी शिक्षक व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक यांनी लक्ष द्यावे▪ कार्यक्रमाला सरपंच मंगलाताई राक्षे ,ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते▪
