Halloween party ideas 2015


माणगांव येथील शिवम कंप्युटर एज्युकेशन सेंटरचे मालक श्री. भालचंद्र खाडे यांना अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान !

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी डहाणूकर सभागृह महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स काळा घोडा मुंबई येथे झालेल्या अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्र गौरव सन २०२० सन्मान सोहळ्यात माणगांव तालुक्यातील होडगांव या गावचे सुपुत्र, आयटी क्षेत्रातील प्रथितयश उद्योजक, सर्वप्रिय हसतमुख व्यक्तीमत्व, अनेक पुरस्कारांचे मानकरी, अनेक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिवम कंप्युटर एज्युकेशन सेंटरचे संचालक, मालक श्री. भालचंद्र शांताराम खाडे यांना दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन २०२० अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. रायगड जिल्ह्यातील माणगांव च्या
श्री. भालचंद्र शांताराम खाडे यांना अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्र गौरव हा मानद पुरस्कार मिळाल्याने त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार, नातेवाईक आणि समस्त हितचिंतक यांच्या कडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सदर अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यास एमईपीएल या प्रथितयश इलेक्ट्रॉनिक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुधीर म्हात्रे, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. हेमंत सावंत, माजी शिक्षणाधिकारी डॉ जे आर केळुसकर, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सेक्रेटरी जनरल श्री नरेंद्र बागडे, अर्थसंकेतचे श्री अमित बागवे, सौ रचना बागवे इत्यादी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
मा सदर पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मोलाची भर घातली आहे. ज्यांनी शुन्यातून उद्योग अथवा रोजगार उभा करून स्व चरितार्थासह सामाजिक उत्तरदायित्त्व चांगल्या प्रकारे निभावलेआहे. ज्यांनी ज्यांनी आपल्या उद्योगातून महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे अशा प्रथितयश लोकांचा सन्मान अर्थात अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२० या मानद बहुमुल्य पुरस्काराने रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या होडगांव या गावचे सुपुत्र शिवम कंप्युटर एज्युकेशन सेंटरचे सर्वेसर्वा मालक, संचालक माणगांव मधील एक नेहमीच हसतमुख असलेले परोपकारी आणि हरहुन्नरी व्यक्तीमत्व तथा माणगांव तालुक्यातील सर्व टॅक्स पेअर्स चे सर्वप्रिय निष्ठावंत टॅक्स कन्सल्टंट श्री. भालचंद्र शांताराम खाडे यांना दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यामुळे श्री भालचंद्र खाडे यांच्या सह माणगांवकरांची मान निश्चितच उंचावली आहे. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातून त्यांचे हार्दिक अभिनंदन करून स्वागत केले जात आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.