Halloween party ideas 2015


आकार बालशिक्षणच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल बालविकास अधिकारी सिमा ठाकरे आणि सेविका विजयश्री सावंत यांना ना. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पुरस्कार

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत आकार बालशिक्षण उपक्रमा मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केल्या बद्दल बालविकास अधिकारी सिमा ठाकरे मॅडम यांना व पोषण अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल साजे आदिवासी वाडी अंगणवाडी सेविका विजयश्री सावंत माणगाव यांना महिला दिना निमित्त महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन या विभागाच्या माननीय मंत्री महोदया श्रीमती यशोमती ठाकूर व आयुक्त मॅडम इंद्रा भालो सचिव मॅडम कुंदन मॅडम उपआयुक्त नगरकर मॅडम यांचे हस्ते वाळकेश्वर मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृह मलबार हिल येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आकार बालशिक्षण साठी रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री. दिलीप हलदे साहेब व उप मुख्यकार्यकारी आधिकारी माननीय श्री. मंडलिक साहेब व एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत आकार बालशिक्षण प्रशिक्षक सीमा ठाकरे मॅडम यांचे सहकार्य व मार्गदर्शन सतत लाभले. तसेच साजे आदिवासी वाडी सेविका विजयश्री सावंत यांचे काम आदर्श घेण्यासारखे आहे. यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना महिला दिना निमित्त सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास खात्याच्या माननीय मंत्री महोदया श्रीमती यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यामुळे माणगांव तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत महिला व बालविकास विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी सिमा ठाकरे मॅडम आणि अंगणवाडी सेविका विजयश्री सावंत यांचे सोशल मीडिया आणि समाजातील सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.