Halloween party ideas 2015





पारोळा प्रतिनिधी

आज दि.7 मार्च रोजी जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून पारोळा तालुका शिक्षण विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महीलांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्याक्रमास सुजाताताई बाळासाहेब पवार पं.समिती सदस्या या अध्यक्षस्थानी होत्या तर दर्शना अरूण पवार या प्रमुख वक्त्या होत्या.याप्रसंगी बोलताना दर्शना पवार यांनी महीला सक्षमीकरणावर आपले प्रमुख मार्गदर्शन केले,त्या म्हणाल्या संवेदनशील,निकोप स्री व पुरूष घडविणे ही स्री ची तसेच संपुर्ण समाजाची जबाबदारी आहे.प्रमुख पाहुणे म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी बी.बी.वारूळकर ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापीका पाकीजा पटेल, 
अधिक्षिका प्रिती पवार,प्रसिद्ध वकील क्रुतिका आफ्रे ,केंद्रप्रमुख करुणा देवकर,पत्रकार अभय पाटील,बी.टि व्ही संपादक दिपक भावसार,नंदादेवी पाटील,छाया महाजन,हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन तालुक्यातील समस्त महिला शिक्षिकांनी केले होते. .प्रत्येक केंद्रातील सर्व महीला शिक्षिकांनी हिरीरीने सहभाग घेतला.सुंदर व बोधप्रद असे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळेस सादर करण्यात आले.तामसवाडी केंद्रातील शिक्षिकांनी ईशस्तवन सादर केले व आकर्षक असे फलकलेखनही केले होते.मंगरूळ केंद्रातील शिक्षिकांनी स्वागतगीत सादर केले .तर उंदिरखेडा केंद्रातील शिक्षिकांनी लेझीम न्रुत्य करून उपस्थितांचे स्वागत केले .बोळे केंद्रातील महीलांनी समुहन्रुत्य सादर केले .तसेच चोरवड केंद्रातील शिक्षिकांनी कर्तबगार महीलांची वेशभूषा केली होती व सुंदर अशी रांगोळी ही रेखाटली होती..भिलाली केंद्रातील शिक्षिकांनी नाटिका सादर केली .शिरसोदे केंद्रातर्फे लावणी व बहारदार नृत्य सादर करण्यात आले.उंदिरखेडे केंद्रातर्फे बैठे गरबा नृत्य .तामसवाडी केंद्रातील शिक्षिकांनी नृत्य सादर केले.सार्वे व पारोळा केंद्रातील महिलांनीही विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. शेळावे केंद्रातील शिक्षिकांनी सर्व प्रमुख पाहुण्यांना फेटे बांधून कार्यक्रम आगळावेगळा केला. मान्यवरांनी महिलांना उत्तम असे मार्गदर्शन केले.उत्साहपुर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.सुत्रसंचालन जयश्री पाटील व भाग्यश्री पोतदार यांनी केले व आभार करुणा देवकर मॕडमांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे ,नितेश निकम,जितेंद्र वाघ,रामेश्वर भदाणे व समस्त शिक्षण विभाग पारोळा व तसेच सर्व महिला शिक्षिकांनी मेहनत घेतली.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.