Halloween party ideas 2015

अमळनेर शहराच्या विकासासाठी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांची विकासासाठी कटिबद्ध

अमळनेर अमळनेर शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची जबाबदारी पुष्पलता साहेबराव पाटील यांनी स्वीकारल्यानंतर अंमळनेर शहराच्या विकासासाठी युद्धपातळीवर माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखडा तयार केला अल्पावधीतच अमळनेर शहराच्या सौंदर्यात भर पडली. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी थोर पुरुषांची पुतळे उभारले. स्टेट बँकेच्या वरच्या मजल्यावर महीलांसाठी सुसज्ज जीम व अभ्यासिका व योगा हाँल उभारण्यात येत आहे. तरूणाईला योग्य दिशा देण्यासाठी व्यायमशाळा साहित्यासही बांधकाम केले. शिवाजी उदयानाचे सुशोभीकरण करून बाजूला स्केटिंग पाँईट केल्याने विद्यार्थ्यांना खेळाविषयी आवड निर्माण केली. शहरातील ओपन पँलेस सुशोभीकरण केले तर काही प्रभागातील काम युद्ध पातळीवर आहे. प्रभाग सतरामध्ये समाज विकास केंद्र तथा बहुउद्देशीय सभागृह उभारले. लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील एवढयाच कामावर न थांबता शहरातील मुख्य चौकात हायमाँस्ट लावून शहरातील सौदर्यात भर टाकली.अमळनेर शहरातील विप्रोचा रस्ता खराब झाल्याने वाहतूक करणे वाहन चालकांना व स्थानिक रहिवाशांना जिकीरीचे होते.माजी आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाने स्वखर्चाने डांबरीकरण केला.नगरपरीषदेमध्ये महीलांसाठी पाच टक्के निधी उपलब्ध करून महीला विकासासाठी प्राधान्य दिले. सतत अमळनेर शहरात तिन वर्षापासून सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नगरपरीषदेच्या फंडातून महीला बचतगटासाठी दुकाने उपलब्ध करून दिली. सँनेटरी पँड शाळा,काँलेज,बसस्थानक येथे मशीन्स पुरविण्यात आली.
महीला दिनानिमित्त अमळनेर शहरातील महिलांच्या विकासासाठी व शहरातील विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहिल असे बोलतांना सांगितले.

अमळनेर तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अधिकारी,धार्मिक, सांस्कृतिक, आदर्श गृहीणी ,आदर्श माता,साहित्य, पत्रकारिता, खेळ क्षेत्रांत विशेष नावलौकीक करणाऱ्या माझ्या तमाम भगिनींना मानाचा मुजरा...
💐💐💐💐
ईश्वर आर.महाजन
मुख्यसंपादक
बातमी गावाकडची न्यूज पोर्टल.
9860352960




WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.