Halloween party ideas 2015


*कासोदा ला बसस्टॉप व पोलीस स्टेशन ला संरक्षक भिंत मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकारांचे साकडे*

*कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी :-* येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.अविनाशजी ढाकणे यांना गांवातील मुख्य समस्यांचे लेखी निवेदन सादर केले.

सविस्तर वृत्त असेकी काल दि. ७ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. अविनाशजी ढाकणे व मुख्यकार्यकारी अधिकारी , डॉ. बी.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर सर्वच शाळेना संरक्षक भिंत बांधणे कामी कासोद्यात सर्व प्रथम कामाचे उद्घाटन व भूमिपूजन आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले . त्याप्रसंगी तालुका व जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे
विभागीय अध्यक्ष किशोर रायसकडा , उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे , जिल्हाअध्यक्ष प्रविण सपकाळे , महिला जिल्हा अध्यक्ष नाजणींन शेख यांच्या सहमतीने व साप्ताहिक विचार वैभव वृत्तपत्राच्या टीम ने जिल्हाधिकारी डॉ . अविनाशजी ढाकणे , व मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांना लेखी निवेदन दिले . निवेदनात कासोदा येथील लोकसंख्या ३५००० च्या वर व भल्यामोठ्या बाजारपेठेचे गाव असूनही बसस्टॉप नाही , कासोदा व परिसरातील महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी , विध्यार्थीनी व गावातील व परिसरातील ग्रामस्थ कासोदा येथूनच १२ ही महिने तिनही त्रुतू येथूनच ये - जा करत असतात , परंतु कासोद्यात बस स्टॉप नाही , व येवढ्या मोठ्या गावाच्या पोलीस स्टेशनला संरक्षण भीत , व पोलीस कर्मचारी यांना राहण्यासाठी पो.स्टे. च्या आवारात एकही पोलीस क्वॉटर नाही , कासोदा हे गाव हिंदू - मुस्लिम गाव असून अनावधानाने काही घटना घडली त्याचे पडसाद जर वाईट घडले . जमाव पोलिस स्टेशन वर चालून आला तर पोलिस स्वतःचे देखील रक्षण करू शकतील म्हणून कासोदा पोलीस स्टेशनला संरक्षण भिंत व मोठे गेट लावण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व साप्ताहिक विचार वैभव वृत्तपत्राच्या पदाधिकारी यांनी निवेदन दिले. त्याप्रसंगी एरंडोल ता.अध्यक्ष सागर शेलार , पत्रकार राहुल मराठे , पत्रकार वासुदेव वारे , पत्रकार संघाचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.




WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.