Halloween party ideas 2015


ऑस्ट्रेलियाने विश्वविक्रमासह विश्वजेतेपद मिळविले
               आठ मार्च हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक महिला दिन म्हणून पाळला जातो. नेमक्या याच दिवशी महिलांच्या टि- २० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना जगातील सर्वात मोठया मेलबोर्न स्टेडीयमवर यजमान ऑस्ट्रेलिया व डॉर्क हॉस भारत यांच्या दम्म्यान अगदी एकतर्फी झाला. ऑस्ट्रेलियाने भारताला धावांचं शतकही गाठू दिले नाही.
                एकंदर ही सातवी महिला टि २० विश्वचषक स्पर्धा होती. या विजेत्यापदासह ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा करंडक पटकविला. त्यांच्या व्यतिरिक्त केवळ इंग्लंड व विंडीजला हा कारनामा करता आला. या महत्वाच्या सामन्याला प्रत्यक्ष स्टेडीयम मध्ये जवळजवळ ९०००० प्रेक्षक उपस्थित होते. एवढया मोठया प्रेक्षक संख्येसमोर भारतीय संघ देशवासीयांच्या अपेक्षांचे मोठे ओझे घेऊन मैदानात उतरला खरा. परंतु नाणेफेकीपासून प्रत्येक घटना भारताच्या विरोधात घडली.
               ऑस्ट्रेलियन पुरुष संघाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कची पत्नी एलेसा हेली ने पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजी फोडून काढताना ऑस्ट्रेलियन संघाला मजबूती दिली. हेली यष्टीरक्षक म्हणून संघात आहे. तिची दुसरी सलामीची सहकारी बेथ मूनी ही सुद्धा यष्टीरक्षकच आहे पण तिने हेलीसह शतकी भागीदारी करत विजयाची मुहूर्तमेढ रचली. शिवाय मूनीने क्षेत्ररक्षणात सुंदर झेलांचे प्रात्यक्षिकच सादर केले. ऑस्ट्रेलियाने भारताच्या प्रत्येक गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना भारताच्या आवाक्या बाहेरचे लक्ष ठेवले. भारताच्या गोलंदाज निष्प्रभ ठरत असताना क्षेत्ररक्षणही दर्जाहिन झाले.
              एवढे होऊनही भारतीय संघाने या स्पर्धेत पहिल्या सामन्यात कांगारूंना हरविले असल्याने फलंदाजांकडून अपेक्षा होत्या. परंतु या स्पर्धेतूनच प्रकाशझोतात आलेली सोळा वर्षीय सलामीवीर शेफाली वर्मा पहिल्याच षटकात परतली आणि तेथेच भारतीय संघाने हत्यारे ठेवल्याचे दिसले. कारण त्यानंतर सकारात्मक प्रतिकार कोणाकडूनही दिसला नाही. अनुभवी स्मृती मंधानाने आपल्या अपयशाचा पाढा येथेही सुरूच ठेवून संघासाठी कबर खोदली.
              कर्णधार हरमनप्रित कौरचा आज वाढदिवस व तिचा शंभरावा टि २० सामना होता. त्यामुळे तिच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या परंतु तिने संघाला वाऱ्यावर सोडून डग आऊट गाठले. दिप्ती शर्माच्या ३३ धावा व तानीय भट जखमी झाल्याने कन्कशन ऑफ रूलमुळे अचानक संधी मिळालेल्या १६ वर्षाच्या ऋचा घोषच्या १८ धावा यांचा अपवाद सोडल्यास इतर खेळाडूंनी केवळ मैदानावर हजेरी लावायचेय काम केले.
                भारताचा हा पहिलाच अंतिम सामना होता. त्याचाही दबाव संघावर होता. संघात एकमेव वेगवान गोलंदाज असलेली शिखा पांडेही अपयशी ठरल्याने भारताला आणखी मोठा हादरा बसला. प्रमुख फलंदाजांचे अपयश व ऑस्ट्रेलियाचा सर्वांगसुंदर खेळ हेच भारताच्या अपयशाचे कारण ठरले. ऑस्ट्रेलियाचा गृहपाठ छान होता. वास्तविक या पराभवाने भारतीय संघाने खचून न जाता सकारात्मक बाबी घेवून चुका काळजी पूर्वक दुरुस्त केल्या तर भविष्यात हाच संघ भारताला नक्कीच विश्वविजेता बनवेल.
लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.