Halloween party ideas 2015


नवापूर महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाद्वारे जागतिक महिला दिनाचे आयोजन
नवापूर ( प्रकाश खैरनार ) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनींना 'महिला ग्राहक आणि ग्राहक संरक्षण कायदा' यावर मार्गदर्शन करण्यात येऊन त्यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. बी. महाजन, प्रमुख वक्ते म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे जिल्हा सचिव श्रीकांत पाठक, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. ए. जी. जयस्वाल, प्रा. जे. साळी, प्रा. एच. बी. सरतापे आदि उपस्थित होते.
श्रीकांत पाठक यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे स्वरूप सांगून विद्यार्थी हा सुध्दा एक ग्राहक असून वस्तू किंवा सेवा घेतांना चौकस व सतर्क राहावे असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच विद्यार्थीनींनी फसव्या जाहिराती पासून दूर राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. ए. बी. महाजन यांनी ऑन लाइन खरेदीमुळे होणाऱ्या फसवणुकीचे विविध प्रकार सांगून अशी आपली फसवणूक होऊ नये यासाठी चिकित्सक वृत्ती आपल्याकडे असावी, किंवा ग्राहक मंचाकडे तक्रार निवारण करण्यासाठी चे धैर्य असावे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर महिला आणि ग्राहक संरक्षण कायदा या विषयावर चर्चा करण्यात आली, त्यात उरिष गावित, दर्शना गावित, विभा गावित, सोनिया वळवी या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. तसेच प्राचार्य डॉ. ए. जी. जयस्वाल, प्रा. जे. डी. साळी, प्रा. एच. बी. सरतापे यांनीही विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभाग, प्राचार्य डॉ. जयस्वाल, उपप्राचार्य डॉ. महाजन व प्रा. वाय. जी. भदाने यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाचे प्रा. ई. एस. गेडाम यांनी केले व आभार कु. सोनिया वळवी हिने मानले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.