Halloween party ideas 2015


कोरोनामुळे श्रीरामपूरातील काव्य संमेलन स्थगित
श्रीरामपूर : - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) म्हणजेच जागतिक संविधान व संसदीय संघाच्या वतीने येत्या १९ मार्च २०२० रोजी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात होणारी " स्व. सिंधुताई विघावे राज्यस्तरीय काव्यमाला -२०२० " स्थगित करण्यात आली असल्याची माहीती डब्ल्यूसीपीएचे श्रीरामपूर ( महाराष्ट्र ) चॅप्टरचे अध्यक्ष दत्ता विघावे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे
सध्या जगभरातील शंभरावर देशात कोरोनाने थैमान घातला असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी शासकीय पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला साद देत डब्ल्यूसीपीएने आपला सुनियोजित कार्यक्रम स्थगित करून एक चांगला आदर्श ठेवला आहे.
शासकीय यंत्रणेकडून मिळणारे पुढील आदेश व कोरानाची स्थिती बघता प्रस्तुत काव्यमालेची नवीन तारीख योग्य वेळी जाहीर करणार असल्याचे विघावे यांनी पत्रकात म्हंटले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.