Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथिल आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत होळीला सुरवात झाली आहे.होळी पेटवून पाच दिवसीय होळीचा शिमगा उत्सव साजरा करण्याची परंपरा शहरी वातावरणात बदलत्या काळातही जोपासण्याचा प्रयत्न ठाकूरांच्या सामूहिक होळीतून होत आहे.
येथील श्रीराम कॉलनी परिसरातील संत सखाराम महाराजांच्या शेतात सालाबादप्रमाणे होळी करण्यात आली.होळीच्या निमित्ताने वर्षभरातून एकदाच सर्व ठाकूर पुरुष,महिला,युवक युवती,लहान सहान अबाल वृद्ध एकत्रित येतात.ठाकूरच्या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे उंबर झाडाचा दांडा उभा करून ठाकूर होळी करतात.त्यास पायाशी गवऱ्या ठेवून होळीसाठी कोरडे लाकडं लावली जातात.लाकडं व गवऱ्या व होळीचे पूजा,सजावट साहित्य सामूहिक वर्गणीतून गोळा केली जातात.होळी रंगबिरंगी पताका,फुगे लावून महिला आणि पुरुषांनी सजविली.तर जमातीचे स्थानिक प्रमुख दिलीप ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,प्रकाश वाघ,मिनाबाई वानखेडे,अपेक्षा पवार,गुणवंत वाघ,प्रकाश ठाकूर,संजय ठाकूर आदिंनी होळीला पुष्पहार हारडा हार कंगन अर्पण करून पूजन केले.होळीला उपस्थित समाज बांधवांनी अग्नि देऊन होळी पेटवली.नवैद्य होळीला देऊन ' होळी रे होळी' च्या एकच जल्लोषात होळीभोवती आंनदी वातावरणात फेर धरण्यात आला.याप्रसंगी होळीचा प्रसाद म्हणून गुळाची जिलेबी सर्वांना वाटण्यात आली.रात्री उशिरापर्यंत होळीच्या अग्नीभोवती लोक आनंदात उत्साहात असतात.
याप्रसंगी उमेश ठाकूर, देविदास ठाकूर,बेबीबाई ठाकूर,संजय सूर्यवंशी,निलेश वाघ,रविंद्र वानखेडे,धनराज ठाकूर,प्रविण ठाकूर,उमाकांत ठाकूर,कोकिळाबाई ठाकूर,कलाबाई ठाकूर,यशवंतराव सूर्यवंशी,जयवंतराव जाधव, मनिषा ठाकूर,लक्ष्मीबाई ठाकूर,ज्ञानेश्वर ठाकूर,सुरेश ठाकूर,सौ.सरला जाधव,हेमंत वानखेडे, मंगल ठाकूर,देवका ठाकूर,सौ भारती ठाकूर,मिना ठाकूर,सतिष ठाकूर,हिम्मत ठाकूर,विनोद ठाकूर,सचिन ठाकूर आदिंसह मोठ्यासंख्येने ठाकूर समाजाचे लोक उत्साहात उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.