Halloween party ideas 2015


बबिता पटेल राजवड यांना यावर्षीचा ३ रा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार


दि ९ राजवड ता पारोळा
आदर्श गांव राजवड ता पारोळा गजानन माध्यमिक विदयालयाच्या उपक्रमशील व आदर्श युवा शिक्षिका बबिता पटेल यांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला असुन संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशणात राज्यभरातील ८० उपक्रमशील शिक्षकांचा गौरव होणार आहे . अनेक आमदार व खासदार, मंत्री मोहदय उपस्थित राहणार असुन राज्य शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते बबिता पटेल यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे . ह्या शैक्षणिक वर्षात आपल्या कार्याने विविध उपक्रमशीलतेने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कारांची त्यांनी हॅटट्रीक केली आहे हे विशेष . त्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे .
त्या राजवड शाळेच्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या पाकिजा पटेल व गजानन हायस्कुल पारोळा उस्मान पटेल यांच्या कन्या आहेत .मा.आमदार दादासाहेब कृषिभूषण साहेबराव पाटील व मा.जिजामाता कृषिभूषण ताईसाहेब पुष्पलता पाटील नगराध्यक्ष न.पा.अमळनेर यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी गावाकडची या न्युज पोर्टलच्या वतीने अभिनंदन व भावीवाटचालीस शुभेच्छा....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.