Halloween party ideas 2015




*ईगल फौंडेशनचा राज्यस्तरीय गरुडझेप गौरव सोहळा थाटात*
कोल्हापूर प्रतिनिधी
राजश्री शाहु स्मारक कोल्हापूर येथे रविवार दि 8/3/2020 याठिकाणी ईगल फौंडेशनचा राष्ट्रीय गरूडझेप कार्यगौरव सोहळा अत्यंत उत्साहात,थाटात व प्रचंड गर्दीमध्ये पार पडला.
हा दैदिप्यमान सोहळा आयोजित करून तो अतिशय सुरेख ,शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पार पडला.प्रा तौहिद मुजावर यांचे यावेळी मनशांती हा यशाचा मूलमंत्र या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले.प्रा.मुजावर यांचे व्याख्यान ही एक सर्वांसाठी एक पर्वणीच ठरली.अत्यंत प्रेरणादायी विचारांनी त्यांनी सर्व सभागृह खिळवून ठेवल होते .यावेळी आमदार श्री महादेव जानकर,सौ.अरुंधती धनंजय महाडिक, पोलीस निरीक्षक संजय मोरे,विलासराव कोळेकर,यांनी समारंभास शुभेच्छा दिल्या. व्यासपिठावर डॉ.डी.वाय.पाटील ग्रुपचे विश्वस्त सुर्यकांत तोडकर, लयभारी संदेशचे संपादक प्रशांत लाड, जिजामाता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष कुलकर्णी, आदींची विशेष उपस्थिती होती.या सोहोळ्याचे नेहमीप्रमाणे प्रभावी सुत्रसंचालन श्री कुलकर्णी यांनी केले. यावेळी प्रा.डॉ.स्मिता गिरी यांच्या 'काव्य-विभोरी ' या कविता संग्रहाचे व दै.झुंजार सेनापती यांच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या प्रसंगी सौ.स्मिता लंगडे,डॉ.लक्ष्मी भारती,सौ.अरूंधती महाडिक ,सौ.पुजा कदम,,कु.जयश्री चव्हाण, डॉ.राजेंद्र पाटील,कँप्टन गणपतराव घोडके,प्रा.तौहिद मुजावर, प्रा.डॉ.महेशकुमार मोटे आदी कर्तृत्ववान व्यक्तींना दर्जेदार मानपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ईगल फौंडेशनचे उपाध्यक्ष सागर पाटील, शेखर सुर्यवंशी,प्रकाश वंजोळे, प्रा.तुकाराम पाटील ,सुभाष भोसले, दिपक पोतदार, सौ.श्रद्धा पाटील, अशोक शिंदे,कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी चे सर्व पदाधिकारी ,तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष सचीन बैरागी, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष संजय नवले,रायगड संपर्कप्रमुख संजय गायकवाड आदी पदाधिकारीही उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.