माणगांव तालुका स्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत पळसगांव बुद्रुक शाळेच्या ठाकरी घोंगडी या नृत्यास प्रथम क्रमांक -
विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा आनंद द्विगुणित
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती माणगांव शिक्षण विभाग जिल्हा परिषद सेस फंडांतर्गत गुरुवार दिनांक ०५ मार्च रोजी माणगांव तालुक्यातील लोणेरे येथील जे बी सावंत हायस्कूलमध्ये माणगांव तालुका स्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा सन २०१९/२० चे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत तालुक्यातील सात बिटांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या मध्ये पारंपरिक नृत्य स्पर्धेत उत्तेखोल बिटातील पळसगांव बुद्रुक शाळेच्या ठाकरी घोंगडी या सर्वोत्तम नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला. या नृत्याचे नृत्यदिग्दर्शन सौ. स्मिता राजेश पाबरेकर मॅडम यांनी केले होते. या नृत्यासाठी साठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चैत्राली पाटील मॅडम, श्री. रामेश्वर देशमुख गुरूजी, श्री. निलेश साळवी गुरूजी, श्री. राजेश पाबरेकर सर, श्री. सुनील गोरेगांवकर सर, केंद्र प्रमुख बाळासाहेब पालवे सर यांच्यासह विद्यार्थी आणि पालक यांनी विशेष मेहनत घेतली. या शिवाय केंद्रातील व बीटातील सर्व शिक्षकांचे बहुमोल योगदान लाभले. केंद्र व बीट पातळीवर आणि तालुका स्तरावर पळसगांव बुद्रुक शाळेच्या ठाकरी घोंगडी नृत्याला प्रथम क्रमांक मिळाल्याने सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन माणगांव पंचायत समिती सभापती मा. अलकाताई जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर उदघाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सौ. अमृताताई हरवंडकर, माजी सभापती श्री. महेंद्र तेडगुरे मा. सुजीत शिंदे, लोणेरे सरपंच मा. जे बी सावंत संस्थेचे अध्यक्ष मा. घोसाळकर साहेब, जे बी सावंत हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. तसेच माणगांव पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुनिता पालकर मॅडम, केंद्र प्रमुख श्री. अजय पाटील सर, श्री. नरेंद्र खैरे सर, केंद्र प्रमुख श्री. बाळासाहेब पालवे सर, श्री. आंबेतकर सर, श्री. म्हात्रे सर, सौ. पाटील मॅडम, सौ. म्हात्रे मॅडम इत्यादींसह सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
सदर स्पर्धेचे परिक्षण श्री. डांगे सर, श्री. जुवळे सर, श्री. विवेक जाधव सर यांनी केले. तर पारितोषिक वितरण माणगांव पंचायत समिती उपसभापती श्री. राजेशजी पानवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. माननीय गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुनीता पालकर मॅडम यांनी परिक्षक, पंच, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या सर्वांचे आभार व्यक्त केले.या नंतर समारोप करण्यात आला.
