Halloween party ideas 2015


माणगांव तालुक्यातील कवी सुभाष ओव्हाळ ठरले कुसुमाग्रज गौरव पुरस्काराचे मानकरी


       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संंस्था नागपूर यांच्या वतीने वि.वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज)यांचा जन्म दिवस दि.२७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो,या निमित्ताने त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान नेवासा, जि.अहमदनगर येथे दि.२७ फेब्रुवारी २०२० रोजी बहर मराठी प्रतिभेचा सोहळा व कुसुमाग्रज गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये ,रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील विळे धनगरवाडा शाळेतील प्राथमिक. शिक्षक व कवी सुभाष बाबू ओव्हाळ यांनाया वर्षीचा  कुसुमाग्रज गौरव पुरस्कार हा राज्यस्तरीय पुरस्कार संग्रामदादा कुमठेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सदर सोहळ्याला स्वागताध्यक्ष त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान चे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील ,उद्घाटक त्रिमूर्ती पावन च्या अध्यक्षा सुमती साहेबराव घाडगे पाटील तर प्रमुख अतिथी प्रशांत गडाख पाटील, सुनिता शंकरराव गडाख पाटील, मराठीचे शिलेदार समूहाचे संस्थापक, अध्यक्ष राहुलदादा पाटील ,ज्येष्ठ कवी बळवंत भोयर प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ. अशोक शिंदे, प्रा.डॉ. विशाखा कांबळे, डॉ.शिरीष लांडगे मराठी अभ्यास मंडळ पुणे, सचिव उत्तम पाटील, संमेलनाध्यक्षा वैशालीताई अंड्रासकर,रमाकांत काठमोरे शिक्षणाधिकारी अहमदनगर, विलास साठे उपशिक्षणाधिकारी, ग.वि.अधिकारी, गटशिक्षणाधिकरी हेमलता गलांडे हे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातुन श्री. सुभाष ओव्हाळ व श्री. दिगंबर आडीत यांना कुसुमाग्रज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

आयोजित कार्यक्रमात मराठीचे शिलेदार प्रकाशनातर्फे मराठी भाषा गौरव दिन विशेषांक २०२०सहित ७ कविता संग्रहाचे प्रकाशन संपादक राहुल पाटीलयांच्या हस्ते पार पडले, यावेळी राज्यातून ६५ कवींना कुसुमाग्रज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून सुभाष ओव्हाळ यांना या वर्षीचा कुसुमाग्रज पुरस्कार मिळाल्यने रायगड जिल्हातून माणगांवा तालुक्यातून त्याच्या मिञ मंडळी तसेच शिक्षक वर्गातून ते करत असलेल्या सामाजिक धार्मिक संघटेमधून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.      

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.