Halloween party ideas 2015


धाबे ता पारोळा येथे इको फ्रेंडली पर्यावरणपूरक ' एक गांव - एक होळी '
मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी विदयार्थी व ग्रामस्थ यांना शिकविली नैसर्गिक रंग बनविण्याची पध्दत व पर्यावरणपूरक होळी .
दि ७ शेळावे ता पारोळा
वाढणारे वायु प्रदुर्शन व वारेमाप होणारी वृक्ष तोड थांबविण्यासाठी जि प प्राथमिक शाळा धाबे ता पारोळाचे राज्य आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील हे प्रत्येक सण, उत्सव व कार्यक्रम हा पर्यावरण पूरक कसा होईल याबाबत जागृती, प्रयत्न, मार्गदर्शन करून प्रत्यक्ष उपक्रम ही घेतात . याचाच एक भाग म्हणुन गेल्या सात वर्षापासून विदयार्थी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गांवात ' एक गांव - एक होळी ' पर्यावरण पूरक इको फ्रेंडली होळी साजरा करण्यात येत आहे . आज शाळेत मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षण गुणवंतराव पाटील यांनी शेळावे केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांच्या उपस्थितीत विदयार्थ्यांना सोप्या पद्धतीने व निसर्गातील सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तुंनी रंग बनविण्याची पद्धत शिकविली .
आगोदर लिंबाच्या छोटया फांदया तोडुन पाने वेगळी केली, पळसाच्या फुलांचे गुच्छ तोडुन फुले वेगळी केली व झेंडुच्या फुलांच्या पाकळया, बोगन वेलची छान फुले तोडुन उन्हात सुकविल्या . त्यानंतर त्यांचे चुर्ण करून पाणी टाकुन छान रंग तयार केले . हेच चुर्ण मैदा या पदार्थात कमी जास्त प्रमाणात टाकुन त्यापासुनही रंग तयार केले . ही फुले काही दिवस भिजत टाकुन किंवा पाण्यात उकडुन रंग तयार करता येतात .पालक, पुदिना, बीट यांचा रस मैदयात मिसळुन करून रंग बनविले . हळदकुंडाचे चुर्ण करून चुर्ण किंवा ते मैदयात मिसळुन रंग तयार केले . तसेच आपण खाण्याच्या पदार्थात टाकतो ते विविध शुद्ध फुड कलर मैदयात मिसळुन त्या पासुनही रंग बनवुन दाखविले .
पळसाच्या फुलांचा रंग किंवा चुर्ण हे या उन्हात शितल व त्वचा रोगावरील रामबाण उपाय आहेत . या दिवसात पळस बरोबर फुलांनी बहरतो .
तसेच विदयार्थी व ग्रामस्थ यांना इको फ्रेंडली पर्यावरणपूरक होळी कशी साजरा करुन प्रर्दूषण न करता एका पवित्र वातावरणाची निर्मिती कशी करता येते त्याचे प्रात्यक्षिक शाळा परिसरात होळी करून दाखविण्यात आले .
आठ दिवसापूर्वीच शिक्षकांनी विदयार्थांना कला व कार्यानुभव विषयांर्तगत कल्पना देऊन त्यांच्याकडुन गाईच्या शेणाच्या लहान गोवऱ्या, श्रीफळ व विविध आकार बनवुन ते सुकवुन ठेवले .नंतर गोवऱ्यांच्या होळीत लावण्यासाठी माळा बनवुन घेतल्या .आज शाळा परिसर व पटांगण स्वच्छ करून, सडा मार्जन करून, परिसरातीलच नैसर्गिक काडी कचरा व झाडाची छोटी फांदी रोवुन होळी तयार केली . होळीला आजुबाजुला गोवऱ्यांच्या माळा, शेणाचे श्रीफळ लावले . उपलब्ध फुले व रांगोळीने सजावट केली .नंतर सद्गुणांची राखण व दुर्गुणांची होळी करावी या उद्देशाने व मुल्यशिक्षण म्हणुन मानवातील षढरीपु काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर व मानवाच्या विनाशाला कारणीभुत अंहकार व गर्व, आळस कार्डशीटवर लेखन करुन होळीत दहन करण्यासाठी लावण्यात आले .व्यसनांचे प्रतिक तंबाखु पुड्या, पर्यावरण विनाशाचे कारण प्लास्टिक लावण्यात आले . त्या नंतर वातावरण शुद्ध व पवित्रतेसाठी होळीत शुद्ध तुप, कापुर, लवंग, कोरडे श्रीफळ, समिधा, धुप टाकण्यात येऊन दिप ,अगरबत्ती, तांदुळ, पुष्पहार लावुन केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांच्यासह उपस्थित सर्वांनी होळीचे पूजन करून होळी पेटविली .बालकांनी यावेळी वादय वाजवुन जल्लोश केला .
होळी नंतर हाताने बनविलेले रंग एकमेकाला लावुन पाणी विरहित रंगपंचमी साजरा केली .
गावात याच पध्दतीने होळी साजरी केली जाते व आताही आणि यापुढे साजरा करण्याचा संकल्प विदयार्थी व ग्रामस्थांनी केला .
या उपक्रमातुन विदयार्थ्यांना कला व कार्यानुभव विषयांचे ज्ञान होऊन त्यांची सृजनशीलता, नवनिर्मितीची कल्पनाशक्तीत वाढ होऊन ते कार्यप्रवण होतात . स्वनिर्मितीचा आनंद मिळतो, पर्यावरणा बाबत ज्ञान होऊन जागृकता वाढुन मुल्यशिक्षणही मिळते .

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.