अमळनेर प्रतिनिधी
उद्या दि. ०७ मार्च रोजी, धनदाई महाविद्यालय व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ क्षेत्रातील रिसर्च गाईड्स आणि रिसर्च स्टुडंट्स यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या प्रताप तत्वज्ञान केंद्र येथे करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेसाठी प्र-कुलगुरू, चारही विद्याशाखेचे डीन, विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी दहा वाजता होईल व यानंतर ही कार्यशाळा सायंकाळी चार ते पाच वाजेदरम्यान संपन्न होईल. या कार्यशाळेत आपल्या विद्यापीठात मानव्यविद्या शाखेत पीएचडी साठी रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी व त्यांचे गाईड सहभागी होतील.
तरी या कार्यशाळेसाठी पत्रकार म्हणून आपण सादर आमंत्रित आहात.
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
-
🙏🙏
1. प्राचार्य डॉ प्रमोद पवार.
प्र-अधिष्ठाता, मानव्यविद्या शाखा कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव.
२. प्रा लिलाधर पाटील.
कार्यशाळा समन्वयक, धनदाई महाविद्यालय, अमळनेर