Halloween party ideas 2015



शिक्षिकेने उभारली गो कोरोनाची गुढी

आज गुढीपाडवा नववर्षाच्या या पहिल्या दिवशी आपण नवे संकल्प करून प्रगतिकडे वाटचाल करण्याचे ठरवितो. या दिवशी घराच्या अंगणात अथवा इमारतीच्या बाल्कनीत गुढी उभारतो. उंच बांबूची काठी त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, साखरेचा हार त्यावर चांदीचा किंवा पितळ्याचा तांब्या बसवून गुढी साकारली जाते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी मुलुंड मध्ये राहणाऱ्या शिल्पा कारांडे या शिक्षिकेने कल्पकतेने आपल्या घराच्या बाल्कनीत "गो कोरोना" ची गुढी उभारून कोरोनाला हद्दपार करण्याचा संदेश देऊन सर्वांनी लॉक डाउन च्या काळात घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.