*चौगाव येथील संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट ला नाशिक विभागीय संत सावता गौरव पुरस्कार जाहीर*
संत सावता महाराज यांच्या प्रेरणेने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय समाज प्रबोधन कार्य करून समाजाला दिशा देण्याचे महान कार्य करणाऱ्या संस्था संघटना,महिला मंडळे, पंच मंडळे यांना क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती सप्ताह निमित्त संत सावता गौरव पुरस्कार देण्यात येतो.चौगाव ता.धुळे येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट ला नाशिक विभागीय संत सावता गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे महात्मा फुले जयंती सप्ताह निमित्त रविवार १२ एप्रिल रोजी राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले सभागृह क्षत्रिय फुलमाळी समाज संस्था अमळनेर येथे सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्था व क्रांतीसुर्य महात्मा फुले विचारमंच तर्फे नाशिक विभागीय संत सावता गौरव पुरस्काराचे वितरण आहे.स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन नाशिक विभागीय पुरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.संत सावता महाराज ट्रस्ट च्या माध्यमातून सामाजिक धार्मिक कार्येक्रम किर्तन सप्ताह सांप्रदायिक कार्येक्रम महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होतात मंदिराच्या इमारतीत भव्य व्यायाम शाळा आहे वार्षिक कार्येक्रम होत असून परिसरात भव्य सावता मंदिर इमारत आणि सभागृह कोठेही नाही सर्व ट्रस्ट पदाधिकारी विश्वस्त समाज बांधव यांच्या मेहनतीने भव्य मंदिराची उभारणी झाली संत सावता महाराज मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष राजू तावडे यांनी नाशिक विभागीय संत सावता गौरव पुरस्कार ट्रस्ट ला मिळाल्या बद्दल सांगितले आहे की खऱ्या अर्थाने अनेक वर्षाचे विविध सामाजिक कार्येक्रमांचे मेहनतीचे फळ मिळून ट्रस्ट ची दखल घेतली म्हणून समाधान आहे यात संपूर्ण पदाधिकारी विश्वस्त समाज बांधव माता भगिनी सावता भक्त यांचा गौरव झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे.नाशिक विभागीय पुरस्कारासाठी कोणतेही प्रस्ताव मागविला नसून प्रत्यक्ष चौकशी करून माहिती गोळा करून सदर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.पुरस्काराचे सर्वत्र कौतुक होत आहे,.