Halloween party ideas 2015

आ.स्मिताताई वाघ यांनी विधीमंडळात
पुणे येथील भिडेवाडयाचा प्रश्न मांडला..


अमळनेर

प्रतिनिधी


*महिलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवूण देण्यासाठी क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा ज्या भिडे वाडयात सुरु केली त्या वास्तु ची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून ही वास्तु शासना द्वारा ताब्यात घेण्यात यांवी महिला शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या फुले दांपत्याचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यांवे यासाठी आ.श्रीमती स्मिताताई वाघ यांनी आज विधानमंडळात तारांकित प्रश्नाद्वारे मागणी केली.*

आमदार स्मिता वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे माळी समाजात त्यांचे अभिनंदन होत आहे .गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न धुळखात पडला होता. ज्या फुले दाम्पत्यांनी बहुजन समाजाला शिक्षण मिळवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.त्यांच्या भिडेवाडयाचा वास्तुची दुरावस्था झाली आहे. तो प्रश्न आ.स्मिताताई वाघ यांनी शासनाच्या निर्दशनास आणून दिला.
कळमसरे येथील उपसरपंच व  संस्थापक अध्यक्ष खान्देश माळी  महासंघाचे मुरलीधर महाजन यांनी केले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.