जगातील मातब्बर फलंदाजांचा कर्दनकाळ -टिम साऊदी
टिमोथी ग्रँट साऊदी हा न्यूझिलंड क्रिकेटमधील प्रथितयश वेगवान गोलंदाज असून वर्तमान किवीज संघाचा तो उपकर्णधार आहे. नियमित कर्णधार केन विल्यमसनच्या गैजहजेरीत त्याने संघाचे नेतृत्वही केले आहे. उजव्या हाताने जलदगती मारा करणारा हा गोलंदाज तळाकडे घणाघाती फलंदाजी कर
ण्यात चांगलाच पटाईत आहे. ११ डिसेंबर १९८८ रोजी न्यूझिलंडच्या नॉर्थलँड येथील वांघाराई येथे त्याचा जन्म झाला. सीएसके,आरसीबी, राजस्थान रॉयल्स, या संघांकडून आयपीएल खेळलेला साऊदी चांगलाच कसलेला गोलंदाज असून टाय झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये तो न्यूझिलंडसाठी आजवर यशस्वी ठरला नाही. ही त्याची मोठी शोकांतिका आहे.
ण्यात चांगलाच पटाईत आहे. ११ डिसेंबर १९८८ रोजी न्यूझिलंडच्या नॉर्थलँड येथील वांघाराई येथे त्याचा जन्म झाला. सीएसके,आरसीबी, राजस्थान रॉयल्स, या संघांकडून आयपीएल खेळलेला साऊदी चांगलाच कसलेला गोलंदाज असून टाय झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये तो न्यूझिलंडसाठी आजवर यशस्वी ठरला नाही. ही त्याची मोठी शोकांतिका आहे.
न्यूझिलंडच्या १९ वर्षाखालील संघात चमकदार कामगिरी केल्यानंतर प्रकाशझोतात आलेला टिम सन २००८ मध्ये इंग्लंड विरूध्द पहिली कसोटी खेळला. अशी कामगिरी करणारा न्यूझिलंडचा २३७ वा खेळाडू ठरला. १५ जून २००८ रोजी इंग्लंडविरूध्दच त्याने वनडे पदार्पण केलं. तो वनडे खेळणारा १५० वा न्यूझिलंडचा खेळाडू बनला. ५ फेब्रुवारी २००८ या दिवशी त्याचे टि-२० पदार्पण इंग्लंडविरुद्धच झाले. टि-२० खेळणारा तो ३० वा किवीज खेळाडू आहे.
आपल्या १२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ७३ कसोटीत २८४ बळी, १४३ वनडेत १९० बळी, तर ७१ टि-२० सामन्यात ७८ असे एकूण ५५२ बळी त्याच्या खात्यात जमा असून जागतिक क्रिकेट मधील सर्वात धोकादायक गोलंदाज म्हणून त्याची गणना होते.
टिपीकल न्यूझिलंड खेळाडू सारखाच शांत व संयमी स्वभावाचा असलेला हा जलदगती गोलंदाज नुकत्याच भारता विरूध्द संपलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत मालिकावीर ठरला. चार डावात १४ भारतीय फलंदाज त्याचे बळी ठरले. यामध्ये जगातील तत्कालीन अव्वल क्रमांकाचा फलंदाज व भारतीय कर्णधार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज ठरला. कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात कोहलीच्या नेतृत्वात खेळलेला साऊदी कोहलीच्या खेळाचा मोठा दिवाना आहे. खाजगीत व जाहिररीत्याही तो कोहलीची तारीफ करत असतो. मात्र कोहली जेव्हा त्याचा प्रतिस्पर्धी म्हणून उभा ठाकतो तेंव्हा साऊदी त्याचा फडशा पाडण्यासाठी त्वेषाने मारा करतो. आपसातील याच चुरशीत त्याने आतापर्यंत सर्वाधिक दहा वेळा कोहलीला बाद करून स्वतःच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला.
भारताविरुद्धची ही मालिका साऊदीला चांगलीच लाभदायक ठरली. एकदा डावात पाच बळी घेताना भारतीय फलंदाजांना त्याने सतत दबावात ठेवले. याचा लाभ त्याच्या साथीदारांना मिळाला. ख्राईस्टचर्च येथील दुसऱ्या कसोटीत साऊदीने कोहलीला दहाव्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यात बाद करून एक पराक्रमच केला.
कोहली व्यतिरिक्त साऊदीने श्रीलंकेचा कसोटी कर्णधार व सलामीवीर दिमुथा तिलकरत्नेलाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा वेळा बाद केले असून त्या खालोखाल नऊ वेळा शिकार ठरला आहे भारताचा सलामीचा फलंदाज रोहीत शर्मा ! इतकेच नाही तर बांगलादेशच्या तमीम इकबाललाही त्याने ९ वेळा तंबूत धाडले आहे.
टिम साऊदीनंतर विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्या गोलंदाजांमध्ये इंग्लंडच्या जेम्स अँडरसन व ग्रॅमी स्वान प्रत्येकी ८ तर दक्षिण आफ्रिकेचा मॉर्ने मॉर्कल, ऑस्ट्रेलियाचे एडम झांपा व नाथन लायन आणि विंडीजचा रवी रामपॉल यांचा समावेश आहे. त्यांनी प्रत्येकी ७ वेळा कोहलीचा बकरा बनविला.
जगातल्या कोणत्याही अव्वल फलंदाजाची शिकार करण्याची प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते. ते मात्र साऊदीने चांगल्या प्रकारे साकारले असून अजूनही जगभरातले नामवंत फलंदाज त्याच्या रडारवर असून त्याच्या या गुणाचा लाभ मात्र त्याचा देश न्यूझिलंडला होतो हे मात्र मोठं सत्य आहे.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
