Halloween party ideas 2015


माणगाव नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी दिलीप जाधव माणगांव मध्ये जंगी मिरवणूक

बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील माणगाव नगरपंचायत ची उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक आज ४ मार्च रोजी झाली असून रायगड लोकसभा मतदार संघाचे खा. सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार माणगाव नगरपंचायत वार्ड २ मधून निवडून आलेले नगरसेवक दिलीप जाधव यांचा अर्ज २८ फेब्रुवारी या शेवटच्या दिवशी एकमेव उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी कॉग्रेस कडून दाखल करण्यात आला होता.
त्यामुळे दिलीप जाधव यांची बिनिरोध उपनगराध्यक्ष पदी निवड ही पक्की होती दिनांक ४ मार्च ला अधिकृत शिकामोर्तब होऊन निवड करण्यात आली.
आता माणगाव नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ची एक हाती सत्ता आहे. त्यातच राज्यात महविकास आघाडी चे सरकार आसल्याने माणगाव नगरपंचायत महाविकास आघाडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
नगरपंचायत च्या माजी उपनगराध्यक्ष शुभांगी जाधव यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक ४ मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती.
दिनाक २८ फेब्रुवारी रोजी दिलीप जाधव यांचा एकमेव उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज माणगाव नगरपंचायत चे मुख्यअधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. उपनराध्यक्षपदी ४ मार्च रोजी अधिकृत शिक्कमोर्तब होणे बाकी होते.
या वेळी नगरपंचायत च्या नगराध्यक्षा योगिता चव्हाण,माजी नगराध्यक्ष आनंद यादव, स्वच्छता व आरोग्य सभापती रत्नाकर उभारे ,माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक संदीप खरंगटे, नगरसेवक सचिन बोंबले, जयंत बोडरे ,नितीन वाढवळ भाग्यश्री यादव, रिया उभारे,हर्षदा काळे,माधुरी मोरे, सानिया शेट,शुभांगी जाधव इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते .त्यांनी पुषपगुच्छ देवून शुभेच्या दिल्या. यावेळी फटाक्यांची अतिषबाजी करून जंगी मिरवणूक करण्यात आली.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.