Halloween party ideas 2015


वाढदिवस। निमित्ताने........
माळी समाज भूषण ह.भ.प.आबासो मुरलीधर चौधरी सामाजिक बांधिलकी जोपासणारा देवमाणूस
आबा एक सरळ मनाचा माणूस ,फक्त सेवा करणे हेच कर्म, तोच धर्म! असे मानणारा कृतीशील माणूस! कळमसरे गावाचे माळी समाज भूषण, गावात कीर्तन असो ,भजन असो लग्न समारंभ सुखदुःखाचा कार्यक्रम यात आबांची उपस्थिती विशेष असते.

आबांनी अनेक पदे भूषविले. काम करीत असतांना पदाला न्याय दिला.आबांच्या मार्गदर्शनाने दोन्ही मूले उच्चशिक्षित आहेत. मुली व जवाई हेही उच्चशिक्षित असल्याने आबांनी सामाजिक कामाला वाहून घेतले आहे.

आबांनी आपल्या आईवडिलांची मनापासून सेवा करून आपल्या मुलांना व मुलींना योग्य संस्काराचे बाळकडू दिले.आबांचे मुले केशव व निलेश सोज्वळ व प्रेमळ आहेत.मुलीनांही उच्चविद्याविभूषित जवाई मिळाले आहेत. आबा त्यांच्या सर्व प्रपंचात आनंदी आहेत एकंदरीत सर्व सुल व्यवस्थित आहे हा सर्व आनंदी परिवार असण्यामागे आबांची कष्ट आहेत व आई-वडिलांचे आशीर्वाद आहेत . आबांच्या प्रत्येक कामात त्यांच्या पत्नी सावलीसारख्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहतात हेही तेवढेच सत्य.
आबांचा मित्र परिवाराचा गोतावळा मोठा आहे .
कस्तुरी मृगाला शोधण्यासाठी जावे लागत नाही की ,सोनचाफा कुठे फुलला आहे हे शोधण्यासाठी गरज नसते .त्याचा सुगंध त्याची जाणीव घेऊन दरवळत येतो. आबासारख्या माणसाला समजण्यासाठी त्यांनी जमवलेल्या गोतवळयातून होणारी त्यांची ओळख पुरेशी आहे.आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द

आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो
पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत…
काही नाती क्षणांची असतात
काही नाती व्यवहाराची असतात
पण त्यातही कधी-कधी असं एखादं नातं आपण जोडतो
जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतात!!
असचं नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
💐💐💐💐🎂🎂🎂

ईश्वर आर.महाजन
पत्रकार अमळनेर
9860352960

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.