Halloween party ideas 2015



अमळनेर प्रतिनिधी
गांधींच्या असहकार आंदोलनाचे शस्र जनतेने केंद्र सरकारच्या एन पी आर,एन आर सी,सी ए ए विरोधात उगारावे! असे आवाहन राष्ट्र सेवा दलाचे मा. राज्यअध्यक्ष डॉ सुरेश खैरनार यांनी लोकशाही बचाव नागरी कृती समिती आयोजित शिबिरात डॉ बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेच्या सभागृह येथे केले.
देशात संशयास्पद नागरिक सरकारी आकडयानुसार ३२ हजार इतके आहे.तरीही संपूर्ण देशात एन आर सी सारख्या कायद्याच्या माध्यमातून गोंधळ निर्माण करून देशातील आर्थिक मंदी, निम्मा झालेला विकास दर,बेरोजगारी अश्या मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करन हिंदू-मुस्लिम धार्मिक फाळणी करण्याचा उद्देश आहे.महात्मा गांधींनी १९०६ ला दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम तेथील नागरिकत्व कायद्या विरोधात भारतीयांसाठी सत्याग्रह आंदोलन केले.त्याच मार्गाने देशात असहकार आंदोलन लोकांनी करावे असेही डॉ खैरनार यांनी केले.यावेळी त्यांनी अमळनेर शहरात ३० दिवसांपासून सलग सुरू असलेल्या एन आर सी सी ए ए विरोधी धरणे आंदोलनास भेट देऊन संबोधित केले.कार्यक्रमाचे उदघाटन दलित नेते रामभाऊ संदानशिव यांनी केले.जनतेत अभ्यासपूर्ण असा ठोस कृती कार्यक्रम घेऊन जाण्यासाठी कार्यकर्ते तयार होणे गरजेचे आहे असे आवाहन प्रास्ताविकात प्रा अशोक पवार यांनी केले. सुत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा लिलाधर पाटील यांनी केले.
शिबिरास संदिप घोरपडे,प्रा शिवाजीराव पाटिल, काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ पाटील,नगरसेवक मनोज पाटिल,फैय्याज पठाण,नगरसेवक श्याम पाटिल,सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पाटिल, गौतम सपकाळे,यशवंत बैसाने,भारती गाला,योजना पाटील,मा.नगरसेवक विनोद कदम,प्रा जयश्री साळुंके, प्रा सुनिल वाघमारे , शिक्षक संघटनेचे कैलास पाटिल, सिद्धार्थ सपकाळे, आदिंसह मोठ्या संख्येने विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.