Halloween party ideas 2015


*नाशिक विभागीय संत सावता गौरव पुरस्कार जाहीर*
*अमळनेर येथे भव्य पुरस्कार सोहळा चे १२ एप्रिल रोजी वितरण*
अमळनेर : विश्वसंत सावता महाराज यांच्या प्रेरणेने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय समाज प्रबोधनपर सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक कार्य करून समाजाला दिशा देण्याचे महानकार्य करणाऱ्या तालुका,जिल्हा,विभागीय स्तरावरील सामाजिक संस्था,महिला मंडळे,पंच मंडळे यांना क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती सप्ताह निमित्त रविवार दि.१२ एप्रिल रोजी राष्ट्रपिता जोतिबा फुले सभागृह क्षत्रिय फुलमाळी समाज मंगल कार्यालय कुंटे रोड शाळा.१२ समोर अमळनेर येथे साय.४ वाजता संत सावता गौरव पुरस्कार २०२० देऊन सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्था अमळनेर व क्रांतीसुर्य महात्मा फुले विचारमंच तर्फे स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ गुलाबपुष्प व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
विभागीय,जिल्हास्तरीय,तालुका स्तरीय संत सावता गौरव पुरस्काराचे चे मानकरी खालील प्रमाणे आहेत.विभागीय पुरस्कार नाशिक विभागीय विनामूल्य सामुदायिक विवाह समिती धुळे,खान्देश माळी महासंघ,महाराष्ट्र माळी समाज महासंघ,सावित्रीबाई फुले महिला मंडळ माळी वाडा अमळनेर,अखिल भारतीय माळी महासंघ,संत सावता माळी युवक संघ,माळी समाज पंच मंडळधरणगाव,भडगाव,पाचोरा(कृष्णपुरी)क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळ,संत सावता माळी सेवा मंडळ भाजी मार्केट अमळनेर,संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट चौगाव ता.धुळे जिल्हास्तरीय पुरस्कार क्षत्रिय फुलमाळी समाज संस्था अमळनेर,माळी समाज पंच मंडळ पारोळा,कजगाव ता.भडगाव
सावता माळी समाज संस्था कळमसरे,सावित्रीमाई फुले महिला मंडल अमळनेर,सत्यशोधक माळी समाज चाळीसगाव तालुकास्तरीय पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ गांधली,संत सावता माळी मंडळ भिलाली,सावता माळी मित्र मंडळ व माळी महासंघ देवळी,माळी समाज पंच मंडळ दहिवद,(फुलमाळी व काचमाळी) सावता माळी मित्र मंडळ जवखेडा,माळी महासंघ पातोंडा,संत सावता माळी समाज मंडळ पिंपळी,संत सावता नवयुवक मंडळ गांधली,महात्मा फुले युवा मंच अमळनेर,माळी समाज सुधारणा मंडळ शिरूड,महाराष्ट्र माळी महासंघ मुडी,संत सावता गौरव पुरस्कारासाठी सर्वांनी उपस्थिती चे आवाहन सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्थेचे अध्यक्ष व क्रांतीसुर्य महात्मा फुले विचारमंच चे प्रदेश अध्यक्ष प्रविण बी.महाजन यांनी केले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.