Halloween party ideas 2015


प्राची साळुंखे यांना कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार
प्रतिनिधी अमळनेर
चोपडा तालुक्यातील रहिवासी व मुंबई येथे एका वाहिनीच्या वृत्तनिवेदीका प्राची अविनाश साळुंखे यांना कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार 2020 चा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, दै.समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, ह्युमन राईट्स फाऊंडेशन व मीमांसा
फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी जागतीक महिला दिनी देशातील कर्तृत्ववान महिलांचा कुसूमताई चव्हाण महिला भूषण
पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. यंदा या पुरस्काराचे अकरावे वर्ष असून हा चोपडा येथील वृत्तनिवेदीका प्राची अविनाश साळुंखे यांना जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता कुसुम सभागृह व्हीआयपी रोड नांदेड येथे प्रदान करण्यात येणार आहे. या अगोदर हा पुरस्कार राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना प्रदान करण्यात आला आहे त्यात या अगोदर अंतराळ विरांगणा आरती पाटील, एव्हरेस्ट शिखर सर करणारी गिर्यारोहक कृष्णा पाटील, कॅन्सरवर औषधांचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञ डॉ.कल्पना जोशी, रेमन मॅगासीस अवार्ड विजेत्या पद्मश्री निलीमा मिश्रा, चाळीस हजारापेक्षा अधिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या मुंबईच्या जे.जे. हॉस्पीटलमधील डॉ.रागीणी पारीख, वृत्तपत्र क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवणाऱ्या जय महाराष्ट्र चॅनलच्या वरिष्ठ सहाय्यक संपादक सुवर्णा जोशी, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या पद्मश्री कल्पना सरोज, सामाजीक बांधीलकी जोपासत वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉ.अर्चना पाटील चाकूरकर, महाराष्ट्रातील स्वच्छता दुत संगीता आवाळे, आयबीएन
लोकमतच्या निलीमा कुलकर्णी, शांतीवनच्या कावेरी नागरगोजे, एबीपी माझाच्या नम्रता वागळे, कॅरीऑन देशपांडे फेम अभिनेत्री सिमा कदम, परळीच्या नामवंत लघु उद्योजीका सविता आघाव यांना हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.