पातोंडा ता.अमळनेर - (प्रा.भुषण बिरारी) भारतीय सैन्यात सतरा वर्ष अविरत सेवा केल्या नंतर आज सेवा निवृत्त झालेले प्रविण महाजन आपल्या गावी पोहचल्यावर पातोंडा ग्रामस्थ व तरूणांनी त्यांची जल्लोषात वाद्यवृंदाच्या गजरात शोभा मिरवणूक काढण्यात आली.
गावात घरोघरी माताभगिनींनी प्रविणचे औक्षण करत त्याला भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच देशाची अविरत सेवा करून भारत मातेच्या रक्षणार्थ आपल्या आयुष्याची सतरा वर्ष देशाला अर्पण केली म्हणून गावातील तरूणांनी प्रविण महाजन यांचे विषयी कृतज्ञता व्यक्त केली. मिरवणूकी दरम्यान प्रविण महाजन यांनी शहिद दिपक चौधरी यांच्या पुतळयास माल्यार्पण करून श्रध्दांजली अर्पण केली. *शहिद दिपक चौधरी यांच्या आईवडील गुलाब चौधरी व उषाबाई चौधरी यांना भेटण्यासाठी गेले असता आपल्या मुलाची आठवण येऊन अश्रू अनावर झाले. आज प्रविणच्या रूपात माझा मुलगाच माझ्या घरी परतला अशी भावना शहिद दिपक चौधरी यांच्या आईने व्यक्त केली.*
प्रविण महाजन हे मार्च 2003 मधे भारतीय सैन्यात दाखल झाले. आपल्या सतरा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अहमदनगर, जम्मू काश्मीर, बबिना, रूडकी व पुणे या ठिकाणी आपले कर्तव्य बजावले. या प्रसंगी त्यांचे मेहूणे धर्मेंद्र महाजन , भाऊ अनंत महाजन यांनी सपत्नीक शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रविणचा सत्कार केला. तसेच सर्व समाजातील प्रतिनिधींनी प्रविण महाजन यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रविणचे वडील आसाराम महाजन व आई निर्मलाबाई आपला मुलगा सैन्यात कर्तव्य बजावून सुखरूप घरी आला म्हणून त्यांच्या भावना गहिवरून आल्या. या प्रसंगी सरपंच प्रतिनिधी किशोर मोरे, उपसरपंच सोपान लोहार, महेंद्र पाटील सर, स्वप्निल निंबाळकर, जितु बोरसे , बंटी बोरसे, स्वप्निल पवार , योगेश बोरसे , बापू घाडगे, प्रशांत बिरारी, विनोद महाले, प्रशांत माळी , अनिल शिंदे, मछिंद्र लाड व सर्व महादेव चौक मित्र मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. विलास चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
*" देशसेवेचे कर्तव्य पुर्ण करून घरी परतल्यावर माझ्या गावातील ग्रामस्थांचे प्रेम व दिलेला सन्मान पाहून सैन्यात कर्तव्य बजावल्याचा गर्व वाटतो. "*
- *प्रविण महाजन , सेवानिवृत्त सैनिक*
