Halloween party ideas 2015


खेडीढोक शाळा शिक्षकांचे कार्य बघुन समाधान वाटते - चांगदेव धनसिंग पाटील , सरपंच
विविध शालेय उपक्रमांमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी परत
शापोआ अंतर्गत " वॉटर बेल " उपक्रमाची सुरुवात
शेळावे ता पारोळा
जि प उच्च प्राथमिक शाळा खेडीढोक ता पारोळा शाळेत मागील उपक्रमशील शिक्षकांना नवीन बदलुन आलेले उपक्रमशील मुख्याध्यापक व शिक्षिका यांच्या कार्याची साथ मिळाल्याने शाळेचे बाह्यांगासह अंतरंग सुंदर होऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणारे काही विदयार्थी दोन वर्षापासुन गावाच्याच शाळेत परतत असुन यावर्षीही आपल्याच गावाची शाळा उत्तम व मातृभाषेतुनच शिक्षण योग्य याचे महत्व पालकांना पटल्याने शाळेकडे ओढा वाढला आहे .
गावाचेच रहिवासी उप शिक्षक नितिन पाटील, राज्यभर शिव जागर करणारे शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे व दोन वर्षापासुन अमळनेर तालुक्यातुन बदलुन आलेले मुख्याध्यापक दयानंद महाजन,मंजुषा नारखेडे, स्मिता देसले यांच्या संकल्पनेतुन विविध गुणवत्ता वर्धक शालेय, सामाजिक व राष्ट्रीय उपक्रम राबविल्याने शाळेचा कायापालट झाला आहे . नुकतेच शाळेचे स्नेहसंमेलनही पार पडले . यात विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी भरभरून रोख बक्षिसे दिली . त्याचा उपयोग शाळेतील सर्वच विदयार्थ्यांना करत शापोआ अंतर्गत " वॉटर बेल " हा उपक्रम छान प्रमाणित थर्मास युक्त पाण्याच्या बाटल्या विद्यार्थ्यांना गावाचे सरपंच चांगदेव पाटील, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष बाबासाहेब पाटील, रमेश पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते वाटप करुन सुरु केला . यावेळी सरपंच चांगदेव पाटील यांनी शाळा व शिक्षकांचे कार्य बघुन समाधान वाटते . वॉटर बेल उपक्रम सुरू करतांना १२४ विदयार्थ्यांना पाण्याच्या बाटल्याही उपलब्ध करुन दिल्या .विदयार्थ्यांना वेळेवर किंवा घंटा झाल्यावर पाणी पिण्याची सवय लागेल व ते पाण्याच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांना बळी पडणार नाहीत असे प्रतिपादन केले .

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.