Halloween party ideas 2015

राज्यभरात शिपाई पदासाठी
संचमान्यता तात्काळ करणार

निरंजन डावखरे यांच्या प्रश्नावर राज्यमंत्री बच्चू कडू यांचे आश्वासन

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) : खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला अनुकंपा लागू करण्यासंदर्भात शासन अधिवेशनाआधी आढावा घेऊन निर्णय घेईल. तसेच राज्यभरात शिपाई पदासाठी संचमान्यता तत्काळ करण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधान परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांनी नियम ९३ अन्वये उपस्थित केलेल्या सुचनेच्या उत्तरात म्हटले असल्याचे भाजपा शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले. या वेळी राज्य सरकारने अनुकंपा धोरणामध्ये सुधारणा करावी, अशी मागणीही निरंजन डावखरे यांनी केली.
अनुकंपा पदावरील भरतीसाठी एखाद्या संस्थेत पद रिक्त नसेल तर जिल्ह्यातील इतर संस्थेमध्ये किंवा विभागीय स्तरावरील अन्य संस्थेत अनुकंपा नियुक्ती देण्याची सुधारणा करावी. सामान्य प्रशासन व वित्त विभागाने काढलेला शासन निर्णय ग्रामविकास विभागाला जसाच्या तसा लागू होतो. परंतु, शालेय शिक्षण विभागाकडून वेगळा शासन निर्णय काढला जात असल्यामुळे दिरंगाई होते. त्यामुळे शालेय शिक्षण विभागालाही सामान्य प्रशासन व वित्त विभागाच्या निर्णय लागू करावा, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली.
शिपाई पदाची संच मान्यता झालेली नसल्याने अनुकंपा तत्वावर नियुक्तीची शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत. तरी संचमान्यता तत्काळ करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली. त्यावेळी या बाबत १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन बच्चू कडू यांनी दिले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.