Halloween party ideas 2015

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पदासाठी पक्षश्रेष्ठींनी एखाद्या सामान्य कुटुंबातील,पक्षासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्याला संधी द्यावी अशी सर्वच विद्यार्थी सदस्यांची मागणी आहे.
अशातच उत्तर महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी , मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पक्षाशी जोडले जावे म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यापीठ प्रशासनाशी झगडणारे, RSS-ABVP समोर आवाहन उभे करणारे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जळगाव जिल्हाउपाध्यक्ष भुषण संजय भदाणे यांना संधी द्यावी अशी सर्वत्र मागणी होताना दिसत आहे.
भुषण संजय भदाणे हे अमळनेर येथील सर्वसामान्य कुटुंबातून येतात तसेच त्यांचे वडिल संजय काशिनाथ भदाणे हे माध्यमिक शिक्षक आहेत. महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केल्यानंतर अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सहकारी मित्रमैत्रिणींच्या हक्कासाठी आवाज उठविण्यास सुरुवात केली त्यातूनच त्यांना पुढे जाऊन महाराष्ट्र केमिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळाली. त्याबरोबरच त्यांना महाराष्ट्र फार्मसी स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्ष होण्याची संधी प्राप्त झाली. सध्या ते त्या माध्यमातून देखील महाराष्ट्रातील फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी सतत आवाज उठवत असतात आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात.
म्हणून सर्व विद्यार्थ्यांमध्ये एकच चर्चा होतेय की भुषण भदाने यांचा विचार पक्षाने केला पाहिजे
पुणे जिल्हा येथून आकाश झामारे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे तसेच आर आर अबांचे चिरंजीव रोहित आर पाटिल यांच्या नावाची पण चर्चा होत आहे .सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देत असतो असे म्हटले जाते

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.