Halloween party ideas 2015


*कासोदा पोलिसांनी कॉफी पुरविणाऱ्या टवाळ खोरांना लगावला लगाम*

*कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी -*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे . कासोदा केंद्रात साधना माध्यमिक विद्यालय , हाजी एन.एम. सय्यद उर्दु हायस्कूल , शहजादि उर्दु हायस्कूल येथे , एसएससी ची बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येत आहे.

या परीक्षेचा पहिलाच मराठी विषयाचा पेपर असुन
पहिल्याच दिवशी कॉफीचा सुळसुळाट झालेला दिसून येत होता . शाळेत पेपर सुरू असताना बाहेरून कॉफी पुरविणाऱ्यांनी धुमाकूळ घातला असून वर्गातील विद्यार्थी अस्वस्थ झालेले दिसून येत होते . त्यांच्यावर आळा घालण्यासाठी कासोदा पोलीस प्रशासनास यश मिळाले. परीक्षा केंद्रावर अजब प्रकार घडल्याने
एकच खळबळ उडाली परीक्षा सुरू असताना परीक्षेदरम्यान तिघीही केंद्रांवर पोलिसांनी बाहेरून कॉफी पुरविणाऱ्या काही टवाळखोर कॉफी बहाद्दर ताब्यात घेऊन अद्दल घडवत , कासोदा पोलिसांनी मुबंई पोलीस अधिनियम कलम १२० ( ब ) प्रमाणे कार्यवाही केली असून , त्यांच्या पालकांना बोलवून तिकीद देऊन व नोटीस देत पालकांच्या स्वाक्षरीने सोडण्यात आले. पोलिसांच्या कार्यवाहीने कॉफी करणाऱ्यांना व पुरविणाऱ्यांना चांगलाच दणका बसला ...
तसेच जिल्हाधिकारी डॉ . अविनाशजी ढाकणे श केंद्र संचालक जि. के.सावंत यांनी नोटीस काढत परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्राच्या गावातील संपुर्ण झेरॉक्स दुकान पेपर असल्याच्या दिवशी व पेपर होई पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु कासोद्यातील दुकान धारकांनी थेट जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करून कासोद्यात बहुतांश ठिकाणी झेरॉक्स दुकान सुरू असून जादा पैसे घेऊन झेरॉक्स काढत असल्याचे दिसून आले असता कासोदा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. रविंद्र जाधव यांनी कारवाई करत झेरॉक्स मशीन जमा करून घेत , नोटीस बजावत असल्याचे सांगितले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.