Halloween party ideas 2015


माझे वडील विषयावरील निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
अमळनेर-
राष्ट्र सेवा दलाच्या संस्कार केंद्रातर्फे आयोजित माझे वडील या विषयावरील निबंध स्पर्धेत यश रतीलाल महाले,ओम विनोद राऊळ, गौरव किशोर पवार यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला लोकेश गोकुळ पाटील व मिसबाह खाटिक यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
29 स्पर्धकांनी सहभाग नोंदविलेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण संस्कार केंद्रात संपन्न झाले, प्रा अशोक पवार, धनंजय सोनार, डॉ मिलिंद वैद्य, शरद पाटील, दीपक पवार यांचे हस्ते पारितोषिक देण्यात आले . माहिती अधिकार कार्यकर्ते उत्तम तावडे यांनी परीक्षण केले.
या कार्यक्रमास विनोद राऊळ, डॉ भरत बागुल, दीपक पवार, दीपक चव्हाण,सर्जेराव पाटील हे पालक उपस्थित होते.
उत्तम तावडे यांचे कडून खाऊ वाटप करण्यात आला.
तेजस चौधरी, आदित्य चौधरी, अक्षरा सोनार, कृष्णा महाजन, अल्फाईज खाटीक, नैतिक चौधरी या बाल सैनिकांनी केलेले उत्कृष्ट संयोजन सर्वांची दाद घेऊन गेले.
'माझा अभ्यास माझे भविष्य' हा पुढील स्पर्धेचा विषय देण्यात आला आहे.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.