धुळे प्रतिनिधी
धुळे जिल्हा ग्रंथालय संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रमोद महाजन सार्वजनिक वाचनालय खुडाणे येथे घेण्यात आली. धुळे जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी जैताने येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनिल सोनवणे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हाध्यक्ष ग्रंथमित्रआर. ओ. पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अॅड. संभाजीराव पगारे, नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे संचालक डॉ. प्रा. दत्ता परदेशी, बापू नेरकर,डाॅ निरंजन महाजन आदी मान्यवर उपस्थित होते .
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. दत्ता परदेशी यांची नेमणूक करण्यात आली सन 2020 ते 2023 या तीन वर्षासाठी पुढील कार्यकारिणी सर्वानुमते घोषित करण्यात आली. अनिल सोनवणे (जिल्हाध्यक्ष) युवराज बोरसे (उपाध्यक्ष) राहुल महिरे (प्रमुख कार्यवाह) भरत रोकडे (कोषाध्यक्ष) ज्ञानेश्वर माळी (सहकार्यवाह)
संचालक पदी अॅड. संभाजीराव पगारे, डॉ. दत्ता परदेशी, आर. ओ. पाटील(ग्रंथमित्र) अविनाश भदाणे, रोहिदास हाके, बिपिनचंद्र नेरकर, हि.रा. चौधरी, महेंद्र जाधव, नरेंद्र महाजन, हरीश पाटील, नथुराम ठाकरे, नरेंद्र देवरे, राजकिरण राजपूत, पी.पी. महाले, गोविंद भाऊ कांबळे, सुरेश मोरे, सौ कल्पना प्रमोद शेवाळे, कुमारी वैष्णवी प्रकाश बच्छाव
सभेची सुरुवात दिवंगताना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. सभेत पुढील ठराव मंजूर करण्यात आले सन 2019 20 या वर्षाचा जमाखर्च मंजूर करण्यात आला. स न २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले ग्रंथपालन वर्गाचे जनजागृती बाबत चर्चा करण्यात आली. वार्षिक अधिवेशन घेणे बाबत विचार विनिमय करण्यात आले. धुळे जिल्हा ग्रंथालय संघातर्फे वार्षिक अधिवेशनात जे पुरस्कार दिले जातात ते मागवण्या संदर्भात चर्चा झाली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. यावेळी जिल्ह्यातील वाचनालयांचे पदाधिकारी ,कर्मचारी, संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते
