लोन बु येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा
अमळनेर प्रतिनिधी
आज ग्रामपंचायत लोन बु मध्ये प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण करताना ज्येष्ठ नागरिक श्री धनराज नारायण पाटील सोबत लोकनियुक्त सरपंच कैलास पाटील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक साळुंखे आप्पा व समस्त गावकरी आणि ग्रामसभेत सरपंच यांनी जो विद्यार्थी माध्यमिक विद्यालय लोन बु येथे दहावी मध्ये एक नंबर येईल त्याला 15 ऑगस्ट ला ध्वजारोहन करण्याचा सन्मान मिळेल असा ठराव जाहीर केला आणि समस्त गावकऱ्यांनी सर्वानुमते ठराव मान्य केला
यावेळी शिक्षणप्रेमी व ग्रामस्थ मंडळ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.