*खेडी(प्र ज)*-71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या अवचित्य साधून खेडी येथील दोन उद्योगी तरुणांनी मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत कपडे,तर गावातील जेष्ठ नागरिकांना धोतर जोडे सन्मान पूर्वक दिलेत
दरवर्षी प्रजासत्ताक दिनी मराठी शाळेतील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत मार्फत मोफत गणवेशाचे वाटप करण्यात येते परंतु यावर्षी खेडी येथील रहिवासी परंतु सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले कमी वयाचे उद्योजक अशी ख्याती असलेले मयूर शिंदे यांनी मराठी शाळेतील सर्वच बालकांना मोफत गणवेश देऊन दातृत्व सिद्ध केले हे गणवेश त्यांचे काका विलास शिंदे यांनी त्यांच्या शुभहस्ते बालकांना प्रदान केलेत
दुसरे दातृत्व असलेले सुधीर पाटील हे "सीमा सुरक्षा बला"त सैनिक पदावर कार्यरत असून मातृभूमीची सेवा करता,करता आपल्या गावातील जेष्ठ नागरिकांची सेवा म्हणून त्यांनी आपल्या शुभहस्ते जेष्ठांना धोतरजोडे प्रदान करून या दोन तरुणांनी समाजामध्ये एक नवीन आदर्श निर्माण केला आहे
या आदर्श व स्थूत्य उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन ग्रामस्थांनी केले आहे
"शंभरातून एक पहेलवान तयार होतो
हजारातून एक विद्वान तयार होतो
दहाहजारातून एक वक्ता तयार होतो
परंतू लाखामधून देखील दाता तयार होत नाही पण या दोन तरुणांचा दातृत्वातून लहान मुलांच्या व जेष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागले
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे