Halloween party ideas 2015


जन्मापासून ते मृत्यू पर्यंत ची नोंद ठेवणारा ग्रामपंचायत कर्मचारी दुर्लक्षितच मागण्या मंजुरीसाठी शासन स्तरावर पूर्ण प्रयत्न करणार अमळनेर तालुका मेळाव्याप्रसंगी आमदार अनिल पाटील यांचे प्रतिपादन
कळमसरे तालुका अमळनेर वार्ताहर
गेल्या 60 वर्षांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय मिळालेला नसून गावातील प्रत्येक नोंदी व प्रत्येक कामात या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पूर्ण मेहनत असते आज तोच घटक अगदी तुटपुंज्या मानधनावर काम करत आहे आणि तोच घटक आज दुर्लक्षिला गेला आहे तरी मी आमदार म्हणून शासन स्तरावर आपणास चतुर्थश्रेणी मिळविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन आमदार अनिल पाटील यांनी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी ४५११ यांच्या अमळनेर व पारोळा तालुका मेळाव्याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात मारवड येथील भैरवनाथ मंदिर संस्थान येथे ते बोलत होते.
या मेळाव्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती रेखाताई पाटील जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील गटविकास अधिकारी संदीप वायाळ ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष उमेश साळुंखे ग्रामसेवक संघटना तालुकाध्यक्ष संजय पाटील मारवड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयवंत पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मारवड येथील हायस्कूलच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हटले तसेच सर्व मान्यवरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तसेच सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आमदार पाटील यांनी आपल्या मनोगतातून पुढे सांगितले की माझी प्रतोद म्हणून निवड झाल्याने कोणते आमदाराला किती व कोणते प्रश्न मांडावयाचे आहेत याची अधिकार मिळाल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सर्वच प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे सांगितले.
प्रथम संघटनेचे संघटक नरेंद्र पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की काही ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक किंवा सरपंच कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देत असतात.तसेच रात्री अपरात्री कामानिमित्ताने बाहेर गेले असलेले जिवाचे काही बरेवाईट झाले तरी भविष्यात त्यांना कुठलाही विमा किंवा पेन्शन नसल्याने यांचा परिवार उघड्यावर येत असतो तरी शासनस्तरावर याची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांचा विमा काढावा असे सुचविले.
गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्णपणे रास्त आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो शासनाची वसुलीची अट ही कर्मचाऱ्यांनी पुरतीच न ठेवता सरपंच सदस्य व ग्रामसेवकांवर ही आहे या पुढील काळात प्रत्येक ग्रामपंचायतीने वसुली न केल्यास सर्व ग्रामपंचायतींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. शौचालयाच्या वापरासाठी त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे त्यासाठी आमदार पाटील यांच्या वतीने श्री वायाळ यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच विमा व जीपीएफ संबंधी परिपत्रक लवकरच काढून सर्व कर्मचाऱ्यांना ते लागू करण्याविषयी आश्वासन दिले.यावेळी मारवड येथील सरपंच तथा सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष उमेश साळुंखे यांनी आपल्या मारवड ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांचा एक लाखाचा विमा ग्रामपंचायतीमार्फत काढण्यात येईल असे आश्वासन दिले.
जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आजही बऱ्याच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन व राहणीमान भत्ता नाही तसेच सेवा पुस्तके नियमित नाहीत जीपीएफ नाही तरी अशा अवस्थेत तुटपुंज्या मानधनावर हा कर्मचारी आपल्या संसाराच्या रहाटगाडा सुरू ठेवत आहे तरी त्यांच्या मागण्या आमदार पाटील यांनी सोडवाव्यात अशी मागणी केली.
सूत्रसंचालन प्राध्यापक संजय महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेंद्र पाटील यांनी केले मेळावा यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष के डी पाटील उपाध्यक्ष सुभाष पाटील जिल्हा सचिव प्रदीप महाजन नितीन पाटील यांनी परिश्रम घेतले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.