Halloween party ideas 2015



अमळनेर प्रतिनिधी
माध्यमिक विद्यालय निंभोरा शाळेत दरवर्षी प्रमाणे प्रजासत्ताक दिन नाविन्यपूर्ण उपक्रमातुन साजरा करण्यात आला, मागील वर्षी भारतीय संस्कृती जोपासत मुलींनी नऊवारी साड्या व फेटे तसेच मुलांनी कुर्ता पायजमा व फेटे अशा पारंपरिक वेशात लेझीम च्या तालावर प्रजासत्ताक दिन साजरा केला होता आणि आत्ता या वर्षी भारतीय सैनिकांना मानवंदना व देशप्रेम जागृती म्हणून भारतीय सैनिक गणवेश परिधान करून चेहऱ्यावर तिरंगा मार्क लावून " जय जवान जय किसान" अशा प्रकारच्या घोषणा देत सम्पूर्ण गावभर ढोल ताशे यांच्या गजरात व देश भक्ती पर गीत गात डीजे च्या तालावर मिरवणूक काढण्यात आली आणि सर्वी कडे देशभक्ती चे नवचैतन्य निर्माण करण्यात आले व जनजागृती करण्यात आली.
या साठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी.एच. चौधरी यांनी मेहनत घेतली त्यांना श्री. किरण पाटील सर, श्री. एन. आर. चौधरी सर, श्री. विवेक बोरसे सर व किरण शिवदास पाटील ,संजय वाडेकर यांचे सहकार्य लाभले. या बद्दल संस्थेचे सचिव श्री गजानन नाना चौधरी यानी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांचे कौतुक केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.