माध्यमिक विद्यालय भरवस येथे २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण सरपंच श्री अशोक पाटील यांचे हस्ते करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षभरातील संपादन केलेल्या प्राविण्याबद्दल बक्षिस देऊन प्रोत्साहीत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्याचा विविध कलागुणांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणे यात आला. परिसरातील व गावातील असंख्य पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.विजय सोनवणे यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधु भगिनी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.