अंमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला .सकाळी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात समोरील ध्वजा समोर सुंदर रांगोळी काढली त्यानंतर गावात प्रभात फेरी काढण्यात आली.
इयत्ता आठवी नववी दहावीतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या घोषणा देऊन परिसर दुमदुमला. शाळेचे ध्वजारोहण पूर्वी देवगाव देवळी येथील ग्रामस्थ मंडळ शिक्षण प्रेमी विविध संस्थांचे पदाधिकारी जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी यांचे शब्द सुमनांनी स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. अगोदर संविधानाचे वाचन करण्यात आले त्यानंतर शाळेचे ध्वजारोहण संस्थेचे ज्येष्ठ संचालक आण्णासो धर्मराज रामचंद्र पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
इयत्ता 10 वीतील विद्यार्थिनींनी ध्वज गीत सादर केले शाळेचे संचालन शिक्षक एस. के .महाजन यांनी केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा फुले हायस्कूलच्या पटांगणात ध्वजारोहण प्रसंगी प्रताप हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शंकर बैसाणे ,सरपंच अशोक पाटील ,पोलीस पाटील छोटू मोरे ,माजी सरपंच मोतीलाल पाटील, महात्मा फुले हायस्कूलचे संचालक राजाराम बंडू बैसाणे, राजेंद्र कौतिक पाटील ,देवगाव देवळीचे शिक्षण प्रेमी उखर्डू बैसाणे, चावरा वस्तीगृहाचे अधिक्षक सुपडू पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच अनिल वसंत पाटील, देवगाव देवळी येथील ग्रामस्थ मंडळ शाळेतील माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक आय.आर. महाजन, एस.के महाजन ,एच .ओ. माळी शिक्षकेतर कर्मचारी एन.जी देशमुख संभाजी पाटील ,गुरुदास पाटील यांनी प्रयत्न केले