जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाहुटे येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा
पारोळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाहुटे ता.पारोळा येथे ७१वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सुरुवातीला भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन पोलिस पाटील श्री.प्रभाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तद्नंतर ध्वजपूजन श्री.अजब ओंकार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. खंडेराव परशुराम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.उपशिक्षक श्री.गोरख पाटील यांनी सामूहिक संविधान वाचन घेतले. उपशिक्षक श्री.राजेंद्र मनोरे व श्रीमती प्रियंका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बसविलेले 'संदेसे आते है' या गीतावर शाळेच्या मुलामुलींनी लेझिम न्रूत्य सादर केले. सदरहू लेझिम न्रूत्य गावकऱ्यांसाठी आकर्षणाचा व कौतुकाचा विषय ठरला.तद्नंतर केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत विजयी दुर्गेश पाटील, दर्शन शिंदे,अंजली भिल,गोपिका पाटील,आरती भिल आदी विद्यार्थींना सरपंच सौ.हिराबाई भटूलाल पाटील व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.त्यानंतर कै.काळू दलपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री.काशिनाथ काळू पाटील यांनी शाळेस स्मार्ट अँड्रॉइड टि.व्ही.सप्रेम भेट दिला.श्री. कमलेश धर्मराज पाटील उपसरपंच यांनी मोठा डेस्क व शाळेच्या कंपाउंडसाठी रू. २१००० देणगी तर,शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष श्री. खंडेराव परशुराम शिंदे यांनी रोख रु.१५,५०० दिले.श्री.अतुल विजय कदमबांडे माजी सिनेट सदस्य यांनी काँम्प्युटर टेबल व खुर्ची तर,विमा प्रतिनीधी श्री.विलास भिकन पाटील यांनी शाळेस छोटा डेस्क भेटवस्तु म्हणून दिली.यावेळी शाळेस रंगमंच बांधून देण्याचे जाहीर करणारे उपशिक्षक श्री.राजेंद्र शिवाजी मनोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.खंडेराव शिंदे,श्री.आबा पाटील,श्री.भटूलाल पाटील, संजय पाटील,सोपान देसले,अंगणवाडी सेविका सौ.निलिमा पाटील,श्रीमती.मायाबाई पाटील,सौ.बेबाबाई कोळी,सौ.आशाबाई पाटील आदी ग्रामस्थ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदरहू कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.संदिप पवार, श्री.किशोर पाटील,संतोष पाटील,श्री.किरण देसले यांनी परीश्रम घेतले.यावेळी उपशिक्षक राजेंद्र मनोरे यांनी सुत्रसंचालन,तर श्री.गोरख पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.