*महिला आठवडा बाजाराचे बदलले लुक मोठया प्रमाणात प्रतिसाद मा आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांचे हस्ते करण्यात आले उदघाटन*
*महिला आठवडा बाजार, डॉ रेखाताई चौधरी यांची संकल्पना*
आज झेप फाँउनडेशन अमळनेर संचलित महिला आठवडा बाजार भरविण्यात आले असून त्यात आगळे वेगळे लुक बदलले आहे मनमोहक रंगात स्टॉल उभारणी झाली आहे.
डॉ रेखाताई चौधरी व कार्यसम्राट विकास पुत्र मा आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांनी सपोर्ट केलेला हा एक महिलांसाठी स्वतंत्र महिला आठवडा बाजार भरविण्याचे कारण, शहर व तालुक्यातील महिलांना आर्थिक विकास व्हावा व महिला सक्षमीकरणासाठी व महिला गृह उदयोजीकांसाठी व त्यांनी बनविलेल्या विविध वस्तूंचे विक्री स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले.
आज दिनांक 26 जानेवारी 2020 रविवार रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता मा आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. या महिला आठवडा बाजारास प्रतिसाद व गर्दी वाढत आहे.
*महिला आठवडा बाजाराचे आजचे देखणे व भाराऊन टाकणारे वैशिष्ट्ये म्हणजे एका महिलेने 10:00 रुपयात भरित भाकर लावलेले स्टॉल हया महिलेच्या दोन्ही किडनी निकामी आहेत.*
सलाम त्या महिलेला आणि अशा महिलांना सक्षमीकरण करण्या साठी व रोजगार उपलब्ध करून देण्यात मा आमदार श्री शिरीषदादा चौधरी अमळनेर व डाॅ.रेखाताई चौधरी अध्यक्षा झेप फाँउनडेशन अमळनेर हे सहकार्य करीत आहे.या उदघाटन प्रसंगी सर्व झेप फाँउनडेशन अमळनेर सदस्य व स्टॉल धारक महिलां श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार अमळनेर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.