पर्ल इंटरनॅशनल स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
अमळनेर- येथील पर्ल इंटरनॅशनल स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ जल्लोषात व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अमळनेर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार दादासो.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर नगर परिषदेच्या नगरअध्यक्षा मा.सौ.पुष्पलता साहेबराव पाटील, गटशिक्षणाधिकारी मा.श्री.आर.डी. महाजन साहेब,पं. स.अमळनेर, केंद्रप्रमुख मा.श्री.रविंद्र साळुंखे, प्रथम लोकनियुक्त सरपंच मा.सौ. हर्षदा संदीप पाटील, मंगरूळ इ.मान्यवर लाभले होते. तसेच संस्थेचे चेअरमन मा.श्री.चंद्रकांत भदाणे, ग.स.सोसायटीचे व संस्थेचे व्हा.चेअरमन मा.श्री.श्यामकांत भदाणे, सेक्रेटरी मा.सौ.गायत्री चंद्रकांत भदाणे , संस्थेच्या संचालिका मा. सौ. पुष्पलता अशोक मगर सर ,संस्थेचे संचालक मा.श्री.भैय्यासाहेब अशोक मगर , मा. श्री. घनश्याम भदाणे सर व शाळेच्या प्राचार्या सौ.ज्योती सुहागीर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या सौ.ज्योती सुहागीर यांनी केले. आकर्षक रोषणाई, संगीत क्षेत्रातील कलाकारांनी साकारलेली उत्कृष्ट आरास, विविध पद्धतीने केलेली सुंदर अशी सजावट आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. यावेळी शाळेत विविध क्षेत्रात व उपक्रमात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यातआले. अध्यक्षीय भाषणात मा.आमदार दादासो.अनिल भाईदास पाटील यांनी विद्यार्थ्यांना यशस्वितेचा कानमंत्र देत संस्थेच्या कार्याविषयी व शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमाविषयी गौरवोद्गार काढले. तसेच शाळेचे केंद्रप्रमुख मा.श्री.रवींद्र साळुंखे सर यांनी व प्रथम लोकनियुक्त सरपंच (मंगरूळ) मा.श्री. हर्षदा संदीप पाटील यांनी पालकांना व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक नृत्य व कार्यक्रम सादर केले त्यात बेटी बचाव बेटी पढाव ,मंगलागौरी , पर्यावरण बचाव , कोळी गीत, लावणी, पोवाडा , असे नृत्यातून समाज प्रबोधनाचे संदेश देऊन उपस्थितांची मने जिंकली. संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत भदाणे यांनी विद्यार्थ्यांना उच्च व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सदैव कटिबद्ध असण्याचा विश्वास उपस्थितांना दिला. सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका कु.वनिता महाजन व सौ.योगिता पाटील व आभार शाळेचे उपशिक्षक श्री.प्रवीण महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षकवृंद श्री. परेश विसपुते,अशोक पाटील , जयेश गुंजाळ , सौ कल्पना पाटील, सौ गीता देशमुख, दिपाली पाटील , विद्या पाटील तसेच कर्मचारी सखाराम पावरा व सुनीता पावरा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.*