Halloween party ideas 2015


परळ दापोली एसटी माणगांव कळमजे पुलावरून कोसळून अपघात ३१ प्रवासी जखमी

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) मुंबई परळ येथून दापोली रत्नागिरी कडे निघालेल्या रातराणी एसटी बसला माणगांव शहराच्या नजीकच्या कळमजे गावच्या हद्दीत गोद नदीवरील जुन्या ब्रिटिश कालीन पुलावर मोठा अपघात झाला. सदर गाडीतील एकूण ४४ प्रवाशां पैकी ३१ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर माणगांव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर घटनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे नेहमी प्रमाणे मुंबई परळ येथून दापोली रत्नागिरी येथे रवाना होणारी राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस शुक्रवारी २४ जानेवारी रोजी रात्री परळ बस स्थानकातून सदर बसचे चालक देवेंद्र पांडुरंग येलवे आणि वाहक कमलाकर शांताराम निरजूळकर हे आपल्या ताब्यातील एसटी बस प्रवाश्यांसह घेऊन मुंबई परळ येथून दापोली रत्नागिरी कडे रात्री मार्गक्रमण करीत असताना सदर बस इंदापूर सोडल्या नंतर शनिवारी सकाळी पहाटे पाच ते साडे पाच च्या दरम्यान प्रचंड धुक्यातून खरवली फाट्याच्या पुढे कळमजे गावाजवळ असलेल्या गोद नदी पुलावर आली असता सदर एसटी बसच्या देवेंद्र पांडुरंग येलवे या ड्रायव्हरचे अर्थात चालकाचा सदर बस वरील नियंत्रण ताबा सुटला आणि प्रचंड वेगात असलेली एसटी बस कळमजे पुलावरून नदी पात्राच्या बाजूला किनाऱ्यावर जोरदारपणे आदळली.
सदरच्या भयानक दुर्दैवी अपघातात सदर एसटी बसची पुढील आणि मागील दोन्ही बाजूंची चाके निखळून पडली आणि एसटी बसचे प्रचंड नुकसान झाले. या अपघाताच्या वेळेस सदर एसटी बस मध्ये एकूण ४४ प्रवासी होते या पैकी ३१ प्रवाश्यांना आणि सदर एसटी बस च्या चालक आणि वाहक यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना माणगांव पोलीस व वाहतूक पोलीस नाथा दहिफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि स्थानिक लोकांनी माणगांव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगांव जवळील कळमजे गोद नदीवरील या ब्रिटिश कालीन पुलाची मुदत संपली असून हा पुल दिवसेंदिवस धोकादायक होत चाललेला आहे. या पुलावर या आधी काही वर्षा पूर्वी पर्यटकांनी भरलेल्या बसचा प्रचंड मोठा अपघात होऊन मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली होती. या सारखे अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी वारंवार होत असतात तरी संबंधित विभागाने या गंभीर गोष्टी कडे डोळेझाक न करता लवकरात लवकरात लवकर सदर पुलाच्या नवीन निर्माण कार्यासाठी नेटाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.