दि.25.1.20 शनिवार प्रहार अपंग क्रांती आंदोलन अमळनेर यांच्या मार्फत दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत आज अमळनेर डेपो मॅनेजर अर्चना भदाणे मॅडम यांना निवेदन देण्यात आले.यात १) दिव्यांगांच्या राखीव सीट मिळवून देण्यासाठी वाहकाने मदत करणे २)जुने सवलतीचे कार्ड चालू ठेवणे ३)अतितीव्र स्वरूपाच्या दिव्यांगांसाठी मुबलक प्रमाणात व्हिलचेअरची व्यवस्था करून देणे.४)दिव्यांग बंधू आणि भगिनी साठी स्वतंत्र सर्व सुविधायुक्त स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे इ. मागण्यांच्या संदर्भात निवेदन दिले.व डेपो मॅनेजर यांच्या कडुन सकारात्मक प्रतिसाद मिळाला लवकरात लवकर कार्यवाही करू असे आश्वासन दिले.यावेळी प्रहार क्रांती आंदोलनाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, तालुका उपाध्यक्ष अविनाश पाटील, सचिव नीलेश वानखेडे,व प्रहार सैनिक उपस्थित होते.